EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : EPFO | जर तुम्ही एखाद्या संकटात सापडला आहात आणि तुम्हाला तातडीने पीएफची रक्कम (EPFO) काढायची असेल तर आता त्यासाठी 6, 7 दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

सरकारने बनवलेल्या नवीन नियमानुसार, एका तासात 1 लाख रुपयांपर्यंत पीएफची रक्कम सहजपणे काढता येऊ शकते. केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या नियमात बदल केला आहे. जेणेकरून आपत्तीच्या स्थितीत पीएफचे पैसे उपयोगी येतील.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवळ तुम्हाला तो खर्च दाखवावा लागेल, ज्यासाठी तुम्ही आत्कालिन स्थितीत पैसे काढत आहात. अगोदर सुद्धा EPFO मधून मेडिकल इमर्जन्सीसाठी PF चे पैसे काढता येऊ शकत होते.

पण ते तुमचे मेडिकल बिल जमा केल्यानंतर मिळत होते, परंतु हे मेडिकल अ‍ॅडव्हान्स अगोदरच्या सेवेपेक्षा वेगळे आहे.
यामध्ये कोणत्याही प्रकारचे बिल द्यावे लागत नाही. केवळ तुम्हाला अर्ज करायचा आहे यानंतर पैसे खात्यात येतील.

हे देखील वाचा

Gopichand Padalkar | ‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – गोपीचंद पडळकर (व्हिडिओ)

Gold Price Update | सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या आता किती रूपयांना मिळतंय 1 तोळा सोने

तुमचा मोबाइल नंबर बदलला आहे का? तात्काळ Aadhaar Card सोबत करा लिंक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : EPFO | epfo ppf account holders bat bat now money one new rule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update