EPFO | 24 कोटी लोकांच्या पीएफ खात्यात आले पैसे, ईपीएफओने सांगितली घरबसल्या बॅलन्स चेक करण्याची पद्धत; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | ईपीएफओने आतापर्यंत 24.07 कोटी लोकांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले होते की, आतापर्यंत त्यांनी 24.07 कोटी लोकांच्या खात्यात 2020-21 या आर्थिक वर्षात PF व्याजाच्या 8.50 टक्के दराने पैसे दिले आहेत. आता ईपीएफओने घरबसल्या पीएफ बॅलन्स (PF Balance) कसा तपासावा ते सांगितले आहे. (EPFO)
इतके आले व्याजाचे पैसे
विशेष म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवा झेंडा दाखवला होता. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. आता EPFO ने ग्राहकांच्या खात्यात 8.5% दराने व्याज जमा केले आहे.
अशा प्रकारे जाणून घ्या PF बॅलन्स
एसएमएस द्वारे :
एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
मिस कॉलद्वारे :
पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.
वेबसाइट द्वारे :
– यासाठी EPFO वेबसाइटवर जा.
– येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
– आता View Passbook वर क्लिक करा.
– पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.
उमंग अॅपद्वारे :
– उमंग अॅप ओपन करा.
– यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडा.
– Employee Centric Services निवडा.
– आता UAN & PASSWORD टाका.
– यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल, तो टाका.
– यानंतर व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
Web Title :- EPFO | epfo send pf interest in more than 24 crore people bank account check details now check balance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update