EPFO ने दिला इशारा, कधीही करू नका अशा चूका अन्यथा होऊ शकते पैशाचे मोठे नुकसान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) नोकरदार लोकांना लाभ दिला जातो. या अंतर्गत सरकार दरमहा तुमच्या गुंतवणुकीवर व्याज देते. हा व्याजदर सरकारकडून 8.50 टक्के दिला जात आहे. याशिवाय सदस्यांना पेन्शन योजना आणि कर्ज यासारख्या सुविधाही EPFO कडून दिल्या जातात. ईपीएफओ सदस्यांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे देखील मागवते.
या अंतर्गत सदस्यांना आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) आणि इतर कागदपत्रे द्यावी लागतात. परंतु जेव्हा तुम्ही ईपीएफ खाते (EPF Account) उघडता किंवा तुम्ही त्या अंतर्गत योजनेचा लाभ घेता तेव्हाच त्याचा वापर केला जातो.
याशिवाय, EPF तुमच्याकडून फोन किंवा मेसेजद्वारे कोणतीही माहिती विचारत नाही. आता EPF ने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही आधार कार्ड, पॅन, यूएएन, बँक तपशीलांची माहिती आपल्या सदस्यांकडून मागवत नाही. जर कोणी फोन किंवा सोशल मीडियावर (Social Media) अशी माहिती विचारली तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण ती लीक झाल्यास तुमची फसवणूक (Cheating) होऊ शकते. अशा प्रकारच्या कोणत्याही कॉल आणि संदेशांना उत्तर देऊ नका.
कधीही करू नका हे काम
जर तुमचे EPF खाते असेल, तर तुम्ही पॅन, आधार यासारखी महत्त्वाची माहिती शेअर करू नये. याशिवाय तुमच्या खात्याचा UAN क्रमांकही शेअर करू नये. कारण हे लीक झाल्यास फसवणूक होण्याची शक्यता वाढू शकते. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास त्याविरोधात पोलिस तक्रारही करू शकता. (EPFO)
होऊ शकते पैशाचे मोठे नुकसान
कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते हे कर्मचार्यांची मोठी बचत करण्याचे एक साधन आहे.
अशावेळी तुमची माहिती लीक झाल्यास तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात.
म्हणजेच तुमच्या आयुष्यातील बचतीचा पैसा क्षणार्धात संपुष्टात येऊ शकतो.
त्यामुळे ही कागदपत्रे आणि ईपीएफशी संबंधित इतर माहिती सुरक्षित ठेवावी.
Web Title :- EPFO | epfo warns never make such mistakes or else there may be a big loss of money
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update