EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेशी (EPFO) जोडलेल्या देशातील 6 कोटी लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षातही आपल्याला 8.5 टक्के दरानेच व्याज मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या आज श्रीनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या प्रत्येक आर्थिक वर्षासाठी पीएफ रक्कमेवर व्याज दर जाहीर केले जाते. मागील आर्थिक वर्षी EPFO ने व्याज दर घटवून 8.5 टक्के केले होते. 2019-20 साठी पीएफवर मिळणारे व्याज दर 2012-13 नंतर सर्वात खालच्या पातळीवर होते.

दरम्यान, या बैठकीपूर्वी सरकार या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज दर कमी करू शकते, अश्या बातम्या समोर येत होत्या. ज्यामुळे देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सरकार नोकरी करणाऱ्यांना धक्का बसू शकतो, परंतु सरकारने व्याजदरामध्ये कोणताही बदल न करता 6 कोटी लोकांना दिलासा दिला आहे.

शनिवारी जाहीर झालेल्या वेतनपट आकडेवारीनुसार नवीन नोंदणीची संख्या डिसेंबरमध्ये 24 टक्क्यांनी वाढून 12.54 लाखांवर गेली आहे. नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत ही वाढ 44 टक्के जास्त आहे. या आकडेवारीवरून कोविड – 19 साथीच्या दरम्यान औपचारिक क्षेत्रातील रोजगाराची स्थितीची माहिती होते. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, ईपीएफओच्या वेतनाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये 12.54 लाख खातेदार वाढले,जो एक चांगला संकेत आहे.

आतापर्यंतचे व्याज दर :

– 2020-21 – 8.5 टक्के

– 2019-20 – 8.5 टक्के

– 2018-19 – 8.65 टक्के

– 2017-18 – 8.55 टक्के

– 2016-17 – 8.65 टक्के

– 2015-16 – 8.8 टक्के

– 2013-14 – 8.75 टक्के