×
Homeताज्या बातम्याEPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF...

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) मेंबर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सणासुदीच्या काळापूर्वी EPFO ने देशातील कोट्यवधी नोकरदारांना भेट दिली आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 चे व्याज क्रेडिट करणे, म्हणजे खात्यात टाकण्यास सुरूवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत अनेक खातेधारकांना व्याजाचे पैसे मिळालेले नाहीत. परंतु आशा आहे की लवकरात लवकर खात्यात पैसे येतील.

कारण, व्याजाची रक्कम झोन वाईज के्रडिट होत असल्याने अनेकदा उशीर होतो. तुम्ही सुद्धा तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकता. जाणून घ्या कशाप्रकारे…

1. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या बॅलन्स

रजिस्टर्ड मोबाइल नंबरपासून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून एक संदेश मिळेल.
ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची (PF Account) डिटेल मिळेल.
यासाठी युएएनसोबत बँक अकाऊंट, पॅन (PAN Card) आणि आधार लिंक्ड (Aadhaar) असावे

2. SMS द्वारे

तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा.
सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल.
ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

एसएमएसद्वारे आपण 10 भाषांमध्ये आपल्या पीएफ अकाऊंटची माहिती मिळवू शकता.
उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला EPFOHO UAN MAR टाइप करावे लागेल आणि त्यानंतर 7738299899 वर मॅसेज पाठवावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून त्याच भाषेमध्ये एक मॅसेज येईल ज्यामध्ये तुमची सर्व डिटेल्स असेल.
तर इंग्रजीत जाणून घेण्यासाठी कोणताही कोड टाइप करावा लागणार नाही.

 

3. वेबसाइटवर असे करा चेक

यासाठी EPFO वर जा.

येथे Employee Centric Services वर क्लिक करा.

आता View Passbook वर क्लिक करा.

पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.

 

Web Title : EPFO | good news 6 crore epfo subscribers get 8 5 percent interest rate on pf account check balance marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Yes Bank Case | नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदी ‘वधारली’, जाणून घ्या आजचे दर

Colleges Reopen In Maharashtra | राज्यभरातील महाविद्यालये आजपासून खुली; 50 % पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू 

Must Read
Related News