EPFO | एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी केलंय ‘हे’ काम, जर तुम्ही केले नसेल तर होऊ शकते 7 लाख रुपयांपर्यंत नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही EPFO चे सदस्य असाल आणि आतापर्यंत ई-नॉमिनेशन केले नसेल तर त्वरा करा. हे तुमच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंत सामाजिक सुरक्षा देते. मार्च 2022 पर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी ई-नॉमिनेशन (EPF e-Nomination) केले आहे. (EPFO)
तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) नॉमिनीचे नाव जोडले नाही, तर तुमच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते. EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम दिली जाते.
ईपीएफ कर्मचार्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विम्यासाठी दावा करू शकतात. या योजनेअंतर्गत किमान विम्याची रक्कम 2.5 लाख रुपये आहे. त्याच वेळी, कमाल विम्याची रक्कम 7 लाख रुपये आहे.
स्टेप बाय स्टेप समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया
– EPFO वेबसाईटवर लॉग इन करा. त्यानंतर सर्व्हिसवर क्लिक करा, त्यानंतर कर्मचारी पर्यायावर जा. त्यानंतर सदस्य UAN/ऑनलाइन सेवा वर क्लिक करा.
– UAN आणि पासवर्डने लॉगिन करा.
– मॅनेज टॅबवर क्लिक केल्यानंतर, ई-नॉमिनेशन निवडा.
– Provide Details या टॅबवर जा आणि संपूर्ण माहिती द्या आणि सेव्ह करा.
– कुटुंबाशी संबंधित तपशीलांसाठी येस वर क्लिक करा.
– तुमचे कुटुंब तपशील प्रविष्ट करा. (एकाहून अधिक नॉमिनी देखील नोंदवता येऊ शकतात.)
– नॉमिनेशन तपशीलावर क्लिक करा आणि किती टक्के शेअरचा हक्क असेल ते लिहा.
– नंतर E-Sign वर क्लिक करा. आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
– प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा नॉमिनी, EPF/EPS मध्ये नोंदला जाईल.
Web Title :- EPFO | how to add nominee to pf account by filing enomination
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update