EPFO | ‘या’ 4 पद्धतीने चेक करा आपल्या PF अकाऊंटचा बॅलन्स, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : EPFO | नोकरदार लोकांना पीएफ किंवा भविष्य निर्वाह निधीचे महत्व माहित असते. यासाठी आपल्या खात्याची माहिती वेळोवेळी जाणून घेणे खुप महत्वाचे असते. तुम्ही तुमच्या EPFO म्हणजे पीएफ (PF) बॅलन्स कसा चेक करू शकता याबाबत सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. यासाठी आम्ही 4 पद्धती सांगितल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा EPF (ईपीएफ) बॅलन्स चेक करू शकता.
या 4 पद्धतीने जाणून घेवू शकता पीएफ अकाऊंट बॅलन्स –
1. SMS द्वारे चेक करा पीएफ बॅलन्स
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
2. मिस्ड कॉलने चेक करा पीएफ बॅलन्स
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल
3. EPFO पोर्टलच्या माध्यमातून चेक करा पीएफ बॅलन्स
यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.
4. Umang App द्वारे ईपीएफ बॅलन्स चेक करा
प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
Web Title :- EPFO | how to check pf account balance online via 4 ways
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Coronavirus | चीनमध्ये कोरोनाची दहशत ! बंद होऊ लागले मॉल-हौसिंग कॉम्प्लेक्स, महामारीचा कहर पुन्हा सुरू!
- Pune Corporation | कोरोना काळात ‘स्मशानभूमी’ मध्ये न केलेल्या कामांच्या बिलांची महापालिका प्रशासनाने घेतली गंभीर दखल; कोरोना प्रतिबंधासाठी केलेली कामे व खरेदीचे प्राधान्यक्रमाने ऑडीट करणार
- CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; जाणून घ्या