EPFO | खुशखबर ! PF खातेधारक आता घरबसल्या अपडेट करू शकतात बँक डिटेल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निधी (EPFO) आपल्या खातेधरकांना घरबसल्या बँक डिटेल अपडेट करण्याची सुविधा देत आहे. तुम्ही तुमचे बँक खाते सहजपणे पीएफ खात्यासोबत अपडेट करू शकता. बँक खात्याची माहिती अपडेट नसल्यास तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकणार नाही. अनेकदा असे होते की, सबस्क्रायबर्सने पीएफ खात्याशी लिंक बँक अकाऊंट बंद केलेले असते, परंतु नवीन बँक खाते पीएफ अकाऊंटशी लिंक करण्यास विसरतात. EPFO | how to update bank account details in epf account know check full process
असे अपडेट करा बँक अकाऊंट डिटेल
– सर्वप्रथम EPFO च्या युनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
– येथे UAN व पासवर्ड टाकून लॉग इन करा.
– आता टॉप मेन्यूत ’मॅनेज’ ऑपशनवर जा, यानंतर ड्रॉप डाउन मेन्यूतून KYC निवडा.
– आता तुमची बँक निवडा आणि बँक अकाऊंट नंबर, नाव आणि आयएफएससी कोड (IFSC code) नोंदवा Save वर क्लिक करा.
– ही माहिती एम्प्लॉयर द्वारे अप्रूव्ह झाल्यानंतर अपडेटेड बँक डिटेल्स अप्रूव्ड KYC सेक्शनमध्ये दिसेल.
– यानंतर कंपनीला कागपत्र जमा करा.
असा चेक करा PF बॅलन्स
– ईपीएफओच्या www.epfindia.gov.in वेबसाइट वर जा.
– आता Our Services टॅबमधून For Employees पर्यायावर क्लिक करा.
– Services टॅबपैकी Member Passbook वर क्लिक करा.
– यानंतर लॉग-इन करण्यासाठी UAN आणि पासवर्ड नोंदवा आता आपल्या पीएफ अकाऊंटचे पासबुक पाहू शकता.
Web Title : EPFO | how to update bank account details in epf account know check full process
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | कोंढवे-धावडे परिसरात तरूणाला बेदम मारहाण, पोलिसांकडून 5 जणांचा अटक
Tourism Development | राज्यात पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार