कोट्यावधी EPFO च्या सदस्यांसाठी खुशखबर ! आता स्मार्टफोनवर मिळणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन(EPFO)ने माहिती दिली आहे की आता पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO)आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) देखील शासकीय e-Locker सर्विस डिजिलॉकर (DigiLocker) मध्ये उपलब्ध असतील. ईपीएफओने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘PPO आणि UAN कार्ड आता डिजीलॉकरमध्येही उपलब्ध होतील.’

यानंतर, ईपीएफओ ग्राहक आपले UAN आणि PPO केवळ डिजीलॉकरकडून डाउनलोड करू शकता. (EPFO)च्या या निर्णयामुळे लाखो निवृत्तीवेतनधारक आणि PF सदस्यांना त्यांचे कागदपत्र वेळेवर डाउनलोड करण्यात आणि योग्य लाभ घेण्यास मदत होईल.

पगारदार कर्मचार्‍यांसाठी यूएएन फार महत्वाचे आहे, कारण कर्मचारी त्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खाती ट्रॅक करतात. त्याच बरोबर, PPO हा एक 12 अंकी युनिक नंबर आहे, ज्याच्या मदतीने पेन्शनधारकांना सहजपणे पेन्शन मिळू शकेल. दरवर्षी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करताना PPO क्रमांक आवश्यक असतो.

डिजिलॉकर म्हणजे काय ?
डिजीलॉकर हे केंद्र सरकारचे एक सरकारी अ‍ॅप आहे, ज्यामध्ये आपण आपल्या सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत संग्रहित करू शकता. याद्वारे आपण आवश्यक असल्यास आपल्या कागदपत्रांवर कोठेही प्रवेश करू शकता. या अ‍ॅपवर आपले खाते उघडण्यासाठी, आपल्याला 12-अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल.

डिजिलॉकर पर UAN या PPO नंबर कसे ऍक्सेस कराल

यासाठी, प्रथम आपल्याला https://digilocker.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल.

या संकेतस्थळावर तुम्हाला ‘साइन इन’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

पुढील चरणात आपल्याला आधार क्रमांक आणि युजरनेम प्रविष्ट करावे लागेल.

हा नंबर घातल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल. हे ओटीपी भरल्यानंतर तुम्हाला ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे लागेल.

पुढील चरणात, आपल्याला 6-अंकी पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल आणि बटणावर क्लिक करावे लागेल.

यानंतर ‘Issued Documents’ या पर्यायावर क्लिक करा.

आता एक नवीन पेज उघडेल. यावरील ‘Get more issued documents’ दिले जातील, ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल.

‘Central Government’ टॅब च्या खाली ‘Employees Provident Fund Organization’ वर क्लिक करा.

आपल्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे UAN वर क्लिक केल्यानंतर आपला यूएएन क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर ‘Get Document’ वर क्लिक करा.

असे केल्याने आपला डेटा इश्यू इश्यु विभागात जतन केला जाईल. येथून आपण आपले यूएएन कार्ड डाउनलोड करू शकता.

DigiLocker कसे वापरावे

आपण डिजिलॉकर वेबसाइटवर जाऊ शकता किंवा आपण हे अँप स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू शकता. तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या माध्यमातून ओटीपीच्या मदतीने तुम्ही तुमचा यूजर आयडी बनवू शकता.जर कोणत्याही संस्थेने आपला e-Documentसबमिट केला असेल तर आपण येथून एक्सेस करू शकता.आपण आपले कागदपत्र सबमिट करुन स्वत:e-Sign इन देखील करू शकता.