होळीपुर्वीच 6 कोटी नोकरदारांना मोदी सरकारचा ‘झटका’ ! EPFO कडून व्याजदरात ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी EPFO च्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. यावर्षी 2019 – 2020 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वर 8.50 टक्के व्याज मिळेल. मागील वर्षी म्हणजेच 2018 – 19 मध्ये व्याज दर 8.65 टक्के होते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सीबीटीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत 2019 – 2020 साठी पीएफवरील व्याज दरावर निर्णय घेण्यात आला. सीबीटीच पीएफवरील व्याजदरावर निर्णय घेते आणि या निर्णयाला अर्थ मंत्रालयाची परवानगी आवश्यक असते.

मागील वर्षी व्याज दरात केली होती वाढ –
मागील मार्च 2019 मध्ये आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने 8.65 टक्के व्याज दराची घोषणी केली होती. आर्थिक वर्ष 2017 – 18 मध्ये ईपीएफओने आपल्या अंशधारकांना 8.55 टक्के दराने व्याज दिले होते. यंदा मात्र ईपीएफओने पाच वर्षांपूर्वी केलेल्या 8.55 टक्क्यांपेक्षा कमी व्याज दर निश्चित केला आहे.

तर 2016 – 17 मध्ये ईपीएफओवर व्याज दर 8.65 टक्के होता, तर 2015 – 16 मध्ये हा व्याज दर 8.80 टक्के होता. 2013 – 14 मध्ये आणि 2014 – 15 मध्ये ईपीएफओवर 8.75 टक्के व्याज दर होता. तर 2012 – 13 मध्ये ईपीएफओवर व्याज दर 8.50 टक्के होता.