EPFO Interest Rate | पुढील महिन्यात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 24 कोटी लोकांना मिळेल खुशखबर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO Interest Rate | सुमारे 24 कोटी खातेधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकार यावेळी व्याजदर वाढवू शकते, अशी आशा लोकांना आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील. सर्व EPFO खातेधारकांचे लक्ष या संबंधीच्या बैठकीकडे लागले आहे. (EPFO Interest Rate)

 

गुवाहाटी येथे होईल बैठक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळची (सीबीटी) पुढील महिन्यात बैठक होणार आहे, ज्यामध्ये चालू आर्थिक वर्षातील व्याजदरांवर निर्णय घेतला जाईल. पीटीआयनुसार, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यामध्ये 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव सूचीबद्ध आहे.

 

उत्पन्नाच्या अंदाजावर व्याजदर ठरणार
EPFO 2021-22 साठी सुद्धा 2020-21 प्रमाणे 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवेल का? असे विचारले असता यादाव म्हणाले, हा निर्णय पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे घेतला जाईल. भूपेंद्र यादव हे सीबीटीचे प्रमुख आहेत.

PF वर सध्या 8.5% व्याजदर
मार्च- 2021 मध्ये, CBT ने 2020-21 साठी EPF ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर (Interest Rate) कायम ठेवला होता. ऑक्टोबर-2021 मध्ये अर्थमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली. त्यानंतर ईपीएफओने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना 2020-21 साठी ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्याचे निर्देश दिले होते. (EPFO Interest Rate)

 

अर्थमंत्रालयाची परवानगी आवश्यक
CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला जातो. मार्च-2020 मध्ये ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला. 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.

 

यावेळी वाढीची अपेक्षा
ईपीएफओने 2016-17 आणि 2017-18 मध्ये देखील 8.65 टक्के व्याज दिले होते. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्के होता.
त्याचवेळी 2013-14 मध्ये 8.75 टक्के आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते.
मात्र, 2012-13 मध्ये 8.5 टक्के व्याजदर होता. 2011-12 मध्ये तो 8.25 टक्के होता.

 

24 कोटींहून जास्त खात्यांमध्ये व्याज जमा
अलीकडेच, ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले होते की त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आणखी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा केले आहे.
संस्थेने 8.5 टक्के दराने व्याज दिले आहे.

 

Web Title :- EPFO Interest Rate | good news employees epfo to declare interest rate for 2021 22 in march

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gangubai Kathiawadi | ‘ही’ने अलियाला देखील मागे टाकलं; ‘गंगूबाई काठियावाडी’ला देतेय टक्कर (व्हिडीओ)

 

Plant Based Meat | वेगन मीट म्हणजे काय? हे प्रत्यक्षातील मांसापेक्षा हेल्दी असते का?

 

Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी