EPFO कडून 6 कोटी खातेदारांना ‘इशारा’, ‘हे’ काम करू नका अन्यथा PF चं अकाऊंट ‘रिकामं’ होईल, जाणून घ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निधी संस्था (ईपीएफओ)ने आपल्या ६ कोटी खातेदारांना एक इशारा जारी केला आहे. ईपीएफओ कार्यालयातून कोणाला कधीही फोन केला जात नाही. त्यामुळे कोणीही त्यांची वैयक्तिक माहिती मोबाईल कोणालाही देऊ नये.
ईपीएफओ ने आपल्या खातेदारांना बोगस मोबाईल कॉलविषयी सावधानतेचा इशारा देताना सांगितले आहे की, फसवणूक करणारे भामटे आपण ईपीएफओचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक माहिती मागतात आणि ईपीएफओच्या खातेदाराचे पैसे खात्यातून चोरतात. त्यामुळे कोणत्याही खातेदाराने कोणालाही आपल्या खात्याविषयी माहिती देऊ नये. नाही तर आपल्याला नुकसान होण्याची शक्यता आहे.
Be informed: #EPFO never asks you to share your details or deposit any amount in the bank. Don't disclose your personal information over the phone.#HumHainNa#FraudCalls pic.twitter.com/JyJ2rGP4ls
— EPFO (@socialepfo) October 16, 2019
ईपीएफओने केलेल्या काही सूचना
* ईपीएफओ कार्यालयातून कोणालाही फोन करुन त्यांची माहिती घेतली जात नाही.
* ईपीएफओ कार्यालयाकडून कोणालाही कोणत्याही बँकेत पैसे जमा करण्यास सांगत नाही.
* बोगस फोन कॉलपासून सावधान रहा.
* कोणी आपल्याकडे आधर कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते याविषयी माहिती विचारत असेल तर ती कोणालाही देऊ नका.
ईपीएफओ आता लवकरच डेटा लिकेज आणि फ्रॉड रोकण्यासाठी क्लेम सेटलमेंट स्टेटस तपासण्यासाठी युएएनवर आधारित इन्क्वायरी सिस्टम आपल्या ईपीएफओ वेबसाईटवर सुरु करणार आहे. सदस्य पासबुक ऐप्लिकेशनच्या मार्फत त्यावर जाऊन माहिती घेऊन शकतात. त्यात आपल्याला आपले युजर आईडी आणि पासबुकवरुन लॉगइन करावे लागते. त्यानंतर आपल्याला क्लेम सेटलमेटची स्थिती समजू शकणार आहे. युएएन ला आधार कार्ड लिंक केले गेले आहे.
पेंशन काढण्याच्या नियमात होणार बदल
ईपीएफओ पेंशनशी संबंधित काही नियमांमध्ये बदल करण्याची तयारी करीत आहे. पेंशनसाठीची वयोमर्यादा ५८ वर्षावरुन वाढवून ६० वर्षे करण्यात येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करताना आपली नोकरी ही १० वर्षांची झाल्यावर आपल्याला पेंशनचा हक्क मिळू शकणार असून ५८ वर्षानंतर आपल्याला मासिक पेंशन मिळू शकणार आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –