EPFO कडून PF अकाऊंटमध्ये व्याज होऊ लागले जमा, ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या किती झाली ‘कमाई’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिवाळीपूर्वी पीएफ ग्राहकांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी अगोदरच 8.5% व्याज क्रेडिट मिळाले आहे. मात्र, काही लोकांना आपल्या खात्यात जमा व्याज रक्कम जाणून घेण्यासाठी वेबसाइटवर लॉग इन कसे करावे हे माहित नाही.
कोण-कोणत्या पद्धतीने बॅलन्स चेक करावा, ते जाणून घेवूयात :
- SMS ने सुद्धा पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करता येतो. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये (PF Account) जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
- मिस कॉलने पण बॅलन्स चेक करू शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901046 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.
- उमंग अॅपद्वारे (Umang App) सुद्धा पीएफ खात्याचे पासबुक तपासू शकता. प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. (EPFO)
EPFO वेबसाइटच्या माध्यमातून सुद्धा हे काम करता येऊ शकते. यासाठी
https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.
Web Title : EPFO | know how to check status and earning interest of pf account as epfo starts crediting interest
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Fastag | अॅक्सीडेंट झाल्यानंतर गाडीवरील फास्टॅग काढून टाका, जाणून घ्या काय आहे कारण?