तुमच्या PF खात्यासाठी आता युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ‘अनिवार्य’, घर बसल्या ‘या’ 7 स्टेप्समध्ये करा तुमचा UAN ‘अॅक्टिव्ह’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF खातेदारांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटन कायम पावले उचलत आहे. जेणेकरुन कर्मचारी आपल्या पैशांसबंधित माहिती कुठेही कधीही जाणून घेऊ शकतील. यासाठी ईपीएफओने पीएफ खातेदारांसाठी एक युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची सुविधा सुरु गेली आहे, परंतु अजूनही असे खातेदार आहेत ज्यांना यूएएन नंबर मिळालेला नाही किंवा ज्यांना मिळाला आहे त्यांनी तो अॅक्टिव्ह केलेले नाही. अनेक EPF खात्यात UAN नंबर अॅक्टिव्ह करण्यात आलेला नाही.
काय आहे यूएएन –
यूएएन म्हणजे UNIVERSAL ACCOUNT NUMBER (यूनिव्हर्सल अकाउंट नंबर). सर्व पीएफ खातेदारांना यूएएन नंबर दिले गेला आहे. जेणेकरुन आपल्या पीएफ खात्यासंबंधित माहिती ती कुठेही कधीही मिळवू शकतील. या नंबरच्या माध्यमातून पीएफ काढणे, ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर करणे, केवायसी अपडेट करणे, यूएएन कार्ड, पीएफ पासबूक तसेच अनेक ऑनलाइन काम यूएएनच्या माध्यमातून करु शकतात. नोकरीदारांनासाठी यूएएन नंबर अत्यंत महत्वाचा असतो, या माध्यमातून ते पीएफ अकाऊंटची माहीती मिळवू शकतात. जर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर माहित नसेल तर ईपीएफओच्या वेबसाइटवरुन माहिती मिळवू शकतात.
असे करा यूएएन अॅक्टिव्ह –
1) सर्वात आधी www.epfindia.gov.in च्या वेबसाइटवर जा.
2) नंतर Our Services आणि For employees वर क्लिक करा.
3) तुम्हाला ‘Member UAN/Online Services वर क्लिक करावे लागेल.
4) तुम्हाला Activate your UAN वर क्लिक करावे लागेल.
5) लिंकवर क्लिक केल्यानंतर आणखी एक पेज ओपन होईल, ज्या यूएएन नंबर, मोबाइल नंबर, राज्य, शहर, इस्टेबलिशमेंट आणि पीएफ अकाऊंटनंबर टाकावा लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर वेरिफिकेशन कोड टाकून ‘GET PIN’ वर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर 5 मिनिटात तुमच्या मोबाइल फोनवर एक पिन येईल. जो फॉर्मध्ये एन्टर करुन सबमिट करा.
6) ओटीपी टाकल्यानंतर I Agree वर क्लिक करा.
7) शेवटी Validate OTP आणि Activate UAN वर क्लिक करा.
ई-मेलवर मिळेल अॅक्टिव्हवेशन लिंक –
पिन सबमिट केल्यानंतर विंडो ओपन होईल, त्यात तुमचे नाव, वडीलांचे नाव, कंपनीचे नाव, यूएएन आणि जन्मदिनांक लिहा. यात तुम्हाला तुमच्या यूएएन अकाऊंटमध्ये लॉगिंन केल्यानंतर पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर तुमचा ईमेल आयडी नोंदवा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येईल. ज्यात अॅक्टिव्हवेशन लिंक असेल. तुमच्या ई-मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यावर ईपीएफओची वेबसाइट ओपन होईल, ज्यावर ईमेल आईडी कन्फर्मेशनचा मेसेज मिळेल.
आवश्यक बाबी –
1. तुमच्या यूएएन आणि पासवर्डने लॉगिन करा. लॉगिनसाठी http://uanmembers.epfoservices.in/ या लिंकवर जा. येथे तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाका आणि लॉनिग बटनावर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. जे तुमच्या अकाऊंटचे पेज असेल.
2. आता तुम्ही तुमचे यूएएन कार्ड आणि पासबूक डाऊनलोड करु शकतात. पासबूक द्वारे तुम्ही पीएफमध्ये किती रक्कम आहे ते पाहू शकतात.
3. तसेच तुमचा मेंबर आयडी आणि एस्टेबलिशमेट कोड देखील लिहू शकतात. याद्वारे तुम्ही मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड बदलू शकतात.
- फेसबुक पेज लाईक करा –
- वाढत्या वयात महिलांना होतात ‘या’ 6 समस्या ; असा करा बचाव !
- ‘ब्रेन स्ट्रोक’ टाळण्यासाठी करा ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या 12 लक्षणे
- ‘बॉडी डिटॉक्स’ म्हणजे काय ? बिघडले तर ‘हे’ 5 परिणाम होतात शरीरावर
- काय आहे ‘हर्निया’ आजार ? या 8 पद्धतीने घ्या काळजी
- भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर !
- ALERT थंडीत वाढते वजन ! ‘या’ 6 उपायांनी ठेवा नियंत्रणात, ‘ही’ आहेत 5 कारणे