PF च्या नियमात होणार मोठे बदल ! ‘या’ लोकांना मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रॉव्हिडेंट फंड तुमच्या पगारातील एक प्रकारची बचत असते. इन हँड सॅलरी मिळवणारे पीएफमधून कमी पैसे कापण्यात यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हीच समस्या सोडवण्यासाठी EPFO ने मोठे पाऊल उचलले आहे. ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पीएफचे कंट्रीब्यूशन कमी करु शकतात. वर्किंग वुमन, दिव्यांग प्रोफेशनल तसेच 25 – 30 वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना आपल्या पीएफमधील कंट्रीब्यूशन 2-3 टक्क्याने कमी करण्याची परवानगी मिळाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पीएफमध्ये कंट्रीब्यूशन कमी करण्याचा नियम सर्वांना लागू नाही. ते म्हणाले की काही श्रेणींना याची परवानगी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या श्रेणी काही निर्धारित मानकांच्या आधारे केले जाईल.

ज्या मानकांवर विचार केला जात आहे, त्यात वर्किंग वुमन आणि दिव्यांग पेशाच्या कर्मचाऱ्यांच्या श्रेणीचा समावेश आहे. कामगार मंत्रालय 2-3 टक्के कमी पीएफ कंट्रीब्यूशनसाठी परवानगी देण्यासाठी श्रेणी तयार करण्याच्या मानकावर विचार करत आहे.

या संबंधित निर्णय लवकरच येऊ शकतो. ते म्हणाले की, सरकारला याची कल्पना आहे की रिटायरमेंटवेळी सामाजिक सुरक्षेची आवश्यकता असते. असे असले तरी तरुण कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीच्या दिवसात विवाह, घर खरेदी आणि करिअरसाठी तसेच दुसऱ्या कारणांसाठी जास्त पैशांची आवश्यकता असते. याआधारेच या प्रस्तावावर विचार केला जात आहे.

सध्या तुम्ही कोणत्या परिस्थितीत पीएफमधील पैसे काढू शकतात –
पीएफ संबंधित सरकारने नुकतेच काही बदल केले आहेत. जर कोणी पीएफमधील पैसे काढू इच्छित असेल तर तुम्ही ऑनलाइन क्लेम करु शकतात. त्याच्या काही स्टेप्स आहेत.

1. लग्नासाठी –
विवाहासाठी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून किती रक्कम काढतात हे तुमच्या पीएफ खात्याच्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुम्ही आपल्या मुला, मुलीसाठी, भाऊ/बहिणीसाठी किंवा स्वत:च्या विवाहासाठी पीएफमधून रक्कम काढू शकतात. तुमच्या बाजूने तुम्ही पीएफ खात्यातील योगदानाचा 50 टक्के हिस्सा काढू शकतात.

2. शिक्षणासाठी –
पत्नी किंवा पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही पीएफ खात्यातील तुमच्या योगदानातील 50 टक्के रक्कम व्याजासह काढू शकतात. दोन प्रकरणात हे आवश्यक आहे की तुम्ही एका संस्थेत किमान 7 वर्ष काम करत असला पाहिजेत.

3. घर आणि जमीन खरेदीसाठी –
जर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करु इच्छितात आणि तुम्हाला नोकरी करुन 5 वर्ष झाले आहेत तर तुम्ही काही अटीसह पीएफमधून पैसे काढू शकतात. प्लॉट खरेदी करताना माहिन्याच्या वेतनाच्या 24 टक्क्यांपर्यंत आणि घर खरेदी करताना किंवा तयार करताना मासिक वेतनाच्या 36 टक्क्यांपर्यंत पीएफ काढू शकतात. तुम्ही यात तुमच्याकडून आणि कंपनीकडून देण्यात आलेले योगदान आणि व्याजाच्या रक्कमेसह क्लेम करु शकतात.

4. वैदकीय आपात्का्लीन परिस्थिती –
जर तुम्ही स्वत:चा, पत्नी, मुलांचा किंवा आई-वडीलांचा- वैद्यकीय उपचार करण्यासाठी पैसे काढू इच्छितात तर मासिक वेतनाच्या 6 टक्के किंवा पीएफची पूर्ण रक्कम, जे काही कमी असेल ते काढू शकतात. एखाद्या गंभीर आजारात पीएफ खात्यातून पैसे काढू इच्छित असाल तर तुम्हाला एका महिन्यात किंवा आधिक काळापर्यंत निश्चित रुग्णालयात दाखल असल्याचे प्रमाणपत्र, लीव्ह सर्टिफिकेट आणि ईएसआय न देण्यात येण्याच्या घोषणेसंबंधित कंपनी (संस्था) किंवा ईएसआयद्वारे जारी सर्टिफिकेटची आवश्यकता असेल.

5. नोकरी गेल्यास –
पहिल्या वर्षी EPFO ने आपल्या कर्मचाऱ्यांना एका महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरीवर न राहिल्यास पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कमेचा हिस्सा काढण्यास परवानगी दिली होती. पीएफमधील बाकी 25 टक्के रक्कम नोकरी सोडण्याच्या 2 महिन्यानंतर काढता येईल.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like