नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील 6 कोटीहून अधिक पीएफ खातेदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चालू आर्थिक वर्षात व्याज दरात 15-25 बेस पॉईंट कपातीचा विचार करीत आहे. काही महिन्यांपूर्वी ईपीएफओने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी सदस्यांना 8.65 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता त्याला कात्री लागण्याची शक्यता आहे.
सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक जानेवारीच्या अखेरीस वार्षिक व्याज दरांची घोषणा करू शकतात. यापूर्वी फंज मॅनेजर इन्व्हेस्टमेंट अधिकारी, समिती सदस्य आणि केंद्रीय विश्वस्त मंडळाचे अधिकारी भेटतील. यासंबंधित माहिती दोन सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी ईपीएफओने सदस्यांना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयात प्रस्तावित करत त्यावर मंजुरी मिळविण्यासाठी इपीएफओला सुमारे सात महिने लागले. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी आर्थिक मंदी असल्याचे दिसून येत आहे. कर्जावरील परतावा कमी होत आहे ज्यामुळे ईपीएफओ व्याज कमी करण्याचा विचार करीत आहे. गेल्या एका वर्षात, दीर्घ मुदतीची एफडी आणि बाँडचे उत्पादन 50 ते 90 बेस पॉइंटपर्यंत घसरले आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
व्याजदरामध्ये 100 बेस पॉईंट्सची घट झाल्याने ईपीएफच्या पेआऊटवर 55 ते 70 बेस पॉईंटचा परिणाम होईल, अशीही माहिती मिळाली आहे. यामुळे, ईपीएफओला चालू आर्थिक वर्षात 8.65 टक्के व्याज देणे अवघड होत आहे. सीबीटी मधील कर्मचार्यांच्या प्रतिनिधीने सांगितले की, 2019-20 हे एक कठीण वर्ष आहे परंतु ते व्याजदर 8.65 टक्के असावेत असा ईपीएफओवर आग्रह धरतील.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘फूड पॉयजनिंग’ कशामुळे होते? ‘ही’ आहेत 5 लक्षणे ?
- ‘फंगल इंन्फेक्शन’ दूर करण्यासाठी ‘या’ 2 प्रकारे करा कडूलिंबाचा वापर !
- मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे, मात्र…त्यावर पाणी पीणे नुकसानदायक
- पचनक्रिया बिघडली असेल तर आहारात ‘या’ 7 गोष्टींचा करा समावेश
- तुम्हाला ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ 4 कारणे असू शकतात