EPFO च्या नियमात बदल ! PF खातेदारांना आता ‘ही’ सुविधा मिळणार, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या पीएफ खातेधारकांसाठी (PF Account Holder) अनेक वेगवेगळ्या सुविधा राबवत असते. या माध्यमातून कर्मचारी वर्ग त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित फंड जमा करतात. त्याचबरोबर पीएफ खात्याच्या (PF Accounts) माध्यमातून चांगले व्याज देखील जमा करता येते. याच्यासह पेन्शन योजनेत (Pension Plan) गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील कर्मचाऱ्यांसाठी मोकळा आहे. दरम्यान आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमात बदल केला गेला असल्याची माहिती समोर आलीय. यानूसार पीएफ खातेदार 1 लाख रुपये काढू शकतात, मात्र, ही रक्कम मेडिकल अॅडव्हान्स क्लेम (Medical Advance Claim) अंतर्गत काढता येते. ही रक्कम ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळू शकणार आहे.
दरम्यान, जे वैद्यकीय कारणांमुळे गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांना पैशांची गरज आहे. या नियमानुसार आता कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे, मात्र त्यावर दावा करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. असे नियमबदल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचा-यांच्या सुविधेसाठी केले आहे. दरम्यान, महत्वाचे म्हणजे, तपासणी दरम्यान सर्वकाही बरोबर आढळल्यास आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबधित व्यक्तीच्या खात्यात ऑनलाइन पैसे पाठवले जातील.
कसे काढाल पैसे? (अट काय?) –
– व्यक्तीला सरकारी रुग्णालयात / सीजीएचएस (CGHS) पॅनेल रुग्णालयात दाखल केलेले असावे.
– खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत डिस्चार्ज देण्यापूर्वी स्क्रीनिंग केली जाणार आहे.
– कामाच्या दिवशी अर्ज केल्यास, पैसे दुसऱ्याच दिवशी हस्तांतरित केले जातील.
– कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यावर अथवा रुग्णालयाच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जाऊ शकतात.
एक लाख रुपये कसे मिळवाल?
– अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in वर जाणे.
– यानंतर तुम्हाला ‘ऑनलाइन सेवा’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
– नंतर तुम्हाला फॉर्म 31, 19, 10 C आणि 10 D भरावा लागणार आहे.
– तुम्ही पडताळणी करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक प्रविष्ट करा.
– आता ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ वर क्लिक करणे.
– यासह, तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनूमधून फॉर्म 31 निवडावा लागेल.
– आणि नंतर पैसे काढण्याचे कारण टाकावे लागेल.
– किती रक्कम काढायची आहे ती रक्कम भरा आणि हॉस्पिटलच्या बिलाची प्रत अपलोड करा.
– तुमचा पत्ता प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करणे.
Web Title :- EPFO | new rules epfo gave permission pf account holders will withdraw funds up to one lakh rupees VA
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक