नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO News | जर तुमच्या पगारातून पीएफचा (Provident Fund) काही भाग कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ईपीएफओ (EPFO News) आपल्या खातेदारांना अनेक सेवा प्रदान करते जसे की ऑनलाइन पीएफ बॅलन्स तपासण्याची सुविधा इ. Online PF Balance तपासण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे परंतु जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल आणि तुम्हाला पीएफ बॅलन्स तपासायचा असेल तर ? यासाठी आम्ही तुम्हाला असे दोन सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पीएफ खात्यात किती पैसे शिल्लक आहेत हे जाणून घेऊ शकता. (How To Check PF Balance Without Internet Or Mobile)
एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्स असा तपासा (How to Check PF Balance by SMS)
यासाठी केवळ ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN (LAN) 7738299899 वर मेसेज पाठवा. LAN म्हणजे भाषा होय. इंग्रजी (डिफॉल्ट) व्यतिरिक्त, ईपीएफओ पंजाबी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि बंगालीमध्ये SMS सुविधा प्रदान करते.
ज्या भाषेत संदेश हवा असेल, त्यासाठी फक्त इंग्रजीसाठी ENG, हिंदीसाठी HIN, तेलगूसाठी TEL कोड टाइप करावा लागेल.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला हिंदीत मेसेज हवा असेल तर तुमचा मेसेज EPFOHO UAN HIN असा लिहून पाठवला जाईल. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला बॅलन्सशी संबंधित माहिती मिळेल. ही प्रक्रिया सोपी असून फोनमधील इंटरनेट संपल्यावरही उपयोगी पडते. (EPFO News)
टीप : येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
मिस्ड कॉलद्वारे पीएफ शिल्लक कशी तपासावी (How to Check PF Balance by Missed Call)
जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल तर ही एक सोपी प्रक्रिया आहे,
तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर केवळ मिस्ड कॉल द्यावा लागेल.
मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच, तुम्हाला तुमच्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये तुमच्या पीएफ खात्यात असलेल्या रकमेबद्दल मेसेज येईल.
शिल्लकची माहिती मिळाल्यानंतर, तुम्ही ईपीएफओची अधिकृत वेबसाईट किंवा उमंग अॅपद्वारे शिल्लक रक्कम काढू शकता.
Web Title :- EPFO News | how to check pf balance without internet or mobile data check balance via sms missed call
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update