EPFO News | पेन्शनधारकांना मोठा दिलासा ! कधीही जमा करता येणार Life Certificate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO News | पेन्शनधारकांना (Pensioners) लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीत मोठी सवलत देण्यात आलीय. त्यामुळे भारतातील कोट्यवधी पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे (EPFO News). अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून आपल्या पेन्शनधारकांना एक दिलासा दिला आहे. आता पेन्शनधारक लाईफ सर्टिफिकेट कधीही (Life Certificate Can Give Anytime) सादर करू शकणार आहे. (EPFO : Now Pensioners Can Submit Life Certificate At Any Time)

 

प्रति वर्षामधून एकदा जिवंत असल्याचा पुरावा अर्थात लाईफ सर्टिफिकेट बँकेत सादर करणे पेन्शनधारकांसाठी अत्यावश्यक असते. पेन्शन मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये अथवा पेन्शन थांबू नये यासाठी हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. आता हे प्रमाणपत्र वर्षातून कधीही सादर केलं तरी चालणार आहे. खरंतर हे प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असणार आहे. दरम्यान, यापूर्वी केवळ नोव्हेंबर महिन्यातच लाईफ सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक होतं. त्यामुळे पेन्शनधारकांची अडचण निर्माण व्हायची. (EPFO News)

 

EPFO ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. EPS – 95 चे पेन्शनधारक आता कोणत्याही वेळेस जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. याची वैधता 1 वर्ष असेल, म्हणजेच केवळ नोव्हेंबर महिन्यातच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या कटकटीतून पेन्शनधारकांची सुटका होणार आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात अथवा इतर ठिकाणी असतील अथवा सोबत कुणी नसेल तर त्यांना या ठराविक काळामध्ये प्रमाणपत्र सादर करणे अवघड जात असे.

 

कसे सादर करता येणार सर्टिफिकेट – (‘Life Certificate’)

पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन हे प्रमाणपत्र जमा करू शकतात.

तसेच, बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्येही हे प्रमाणपत्र सादर केलं जाऊ शकतं.

काही कारणाने पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचणं शक्य नसेल त्यांना घरबसल्या हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा आहे.

 

दरम्यान, पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाच्या (Department of Pension Welfare) माहितीनुसार बारा सरकारी बँकांच्या डोअरस्टेप अलायन्स (बँक तुमच्या दारी) अथवा पोस्ट ऑफिसच्या डोअर स्टेप सेवेचा पेन्शनधारक लाभ घेऊ शकतात. या सेवेच्या माध्यमातून पेन्शनधारक डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात.

 

Web Title :- EPFO News | now pensioners can submit life certificate at any time

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा