PF च्या पैशा संदर्भातील प्रत्येक ‘अडचण’ होणार दूर, दर महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार ‘समाधान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला तुमच्या भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित काही समस्या असल्यास यापुढे काळजी करण्याची आवश्यकता नाही. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याअंतर्गत सदस्यांच्या पीएफशी संबंधित प्रत्येक अडचणी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला सोडविण्यात येणार आहेत. ईपीएफओची सर्व क्षेत्र कार्यालये दर महिन्याच्या १० तारखेला ‘निधी आपके निकट’ कार्यक्रम आयोजित करून सदस्यांच्या तक्रारींचे निवारण करतील. अशा परिस्थितीत आपण संबंधित ईपीएफओ कार्यालयात जाऊन आपली तक्रार किंवा समस्या सोडवू शकता.

जर कोणत्या महिन्याच्या १० तारखेला ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या तक्रारी व समस्या सोडविणे सोपे होईल. या कार्यक्रमामागील ईपीएफओचा उद्देश सर्व भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणणे हा आहे. तसेच कार्यक्रमाच्या त्याच दिवशी जर एखाद्या सदस्याची समस्या सोडवील गेली नाही तर सदस्याचा अर्ज शाखा अधिकाऱ्यास चिन्हांकित करावा आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी  महिन्याच्या २५ तारखेला सभासद किंवा भागधारक याची खात्री करुन घेत तक्रार सोडविली पाहिजे. दरम्यान, जर काही कारणास्तव, एखाद्या अर्जदाराच्या तक्रारीचे निराकरण करण्यास वेळ लागत असेल तर ऍक्शन टेकन रिपोर्टसह अंतरिम उत्तर अर्जदाराची समस्या मिळेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पाठवावे लागेल.

ऑनलाइन तक्रार देखील करू शकता : 
याशिवाय आपण आपली तक्रार ऑनलाईनही दाखल करू शकता. यासाठी ईपीएफओने एक वेबसाइट प्रसिद्ध केली आहे. आपण या वेबसाइटवर आपली तक्रार नोंदवू शकता. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, ईपीएफओच्या ऑनलाइन पोर्टल  epfigms.gov.in वर  भेट द्या. येथे आपण आपल्या पीएफ खात्याशी संबंधित तक्रारी नोंदवू शकता. इतकेच नाही तर येथे तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला त्याची स्थितीही कळू शकते. या पोर्टलवर तुम्हाला या सर्व सुविधा मिळत आहेत.

अश्या प्रकारे नोंदवा तक्रार :
तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला या पोर्टलला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला ‘रेजिस्टर ग्रीव्हन्स’ वर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पृष्ठ आपल्यासमोर उघडेल, आपल्याला त्यावरील सर्व तपशील भरावे लागतील. यामध्ये आपल्याला आपला पीएफ नंबर, नाव आणि ज्या कंपनीच्या विरोधात आपली तक्रार आहे त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.

फेसबुक पेज लाईक करा –