आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा देत मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. याद्वारे पेन्शनधारक आता कधीही त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate) म्हणजेच हयातीचा दाखला सादर करू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ईपीएफओने फेस ऑथेंटिकेशन सेवा सुरू केली आहे. पेन्शनधारक आधार फेस आरडी अ‍ॅप (Aadhar FaceRD App) गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. (EPFO)

 

मोबाईल अ‍ॅपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा ही एक ऑनलाइन सेवा आहे, जी सरकारी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारसोबतच इतर सरकारी संस्थांचे पेन्शनधारकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात. (EPFO)

यासाठी पेन्शनर्सने खालील सोपी प्रोसेस फॉलो करावी :

गुगल प्ले स्टोअरवरून Aadhar FaceRD अ‍ॅप डाउनलोड करा.

जीवन प्रमाण पोर्टलवरून फेस (अँड्रॉइड) अ‍ॅप डाउनलोड करा.

ऑपरेटर ऑथेटिकेशन वर क्लिक करा.

पेन्शनर्स ऑथेंटिकेशन वर टॅप करा.

दिलेला पर्याय निवडा आणि तपशील एंटर करा जसे की आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पीपीओ क्रमांक इ.

त्यानंतर फेस ऑथेंटिकेशनसाठी येणार्‍या ऑप्शनवर टॅप करा आणि तुमचे फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल.

कोणत्याही कारणास्तव अर्ज जमा झाला नाही, तर त्याचा संदेश तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल.

 

Web Title :- EPFO | now pensioners can submit digital life certificate sitting at home epfo launches app

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अश्लिल धंदे करता असे म्हणून तरुणीचा विनयभंग करणार्‍या चेअरमनसह तिघांना अटक

PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?

Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph