EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना सुद्धा मिळते पेन्शन, EPFO ने सांगितले त्यांना केव्हापर्यंत मिळत राहील आर्थिक मदत?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या मुलांसाठी एम्प्लॉई पेन्शन स्कीम (EPS) अंतर्गत आर्थिक मदत (Financial Support) मिळू शकते. मात्र, हा फायदा त्या अनाथ मुलांना मिळेल, ज्यांच्या आई-वडिलांपैकी एक किंवा दोघे नोकरदार (Salaried) होते आणि ईपीएस मेंबर होते. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) ट्विट करून ईपीएस स्कीमअंतर्गत अनाथ मुलांना मिळणार्‍या फायद्यांबाबत (EPS Benefits) सांगितले आहे.

 

ईपीएस अंतर्गत अनाथ मुलांना कोणते लाभ मिळतील?

 

  • अनाथ मुलांच्या पेन्शन रक्कम मासिक विधवा पेन्शनच्या 75 टक्के होईल. ही रक्कम किमान 750 रुपये प्रति महिना असेल. (EPFO)
  • एकावेळी दोन अनाथ मुलांपैकी प्रत्येकाला 750 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल.
  • ईपीएस स्कीमअंतर्गत अनाथ मुलांना 25 वयापर्यंत पेन्शन मिळेल.
  • जर मुले एखाद्या अक्षमतेने पीडित असतील तर आयुष्यभर पेन्शन दिली जाईल. (EPFO)

 

ईपीएससाठी पेमेंट करावे लागेल का?

 

  • ईपीएससाठी कंपनी कर्मचार्‍याच्या पगारातून पैसे कापत नाही.
  • कंपनीच्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.
  • नवीन नियमांतर्गत 15,000 रुपयांपर्यंत बेसिक सॅलरीवाल्यांना ही सुविधा मिळेल.
  • नवीन नियमानुसार सॅलरीचा 8.33 टक्के भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.
  • 15,000 रुपये बेसिक सॅलरी असल्यास कंपनी ईपीएसमध्ये 1,250 रुपये जमा करते.

 

Web Title : EPFO | orphan children also get pension under eps 95 epfo how long will they continue to get the benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण ! जबरदस्तीने ऐवज काढून घेतला, कोंढव्यातील घटना

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’

India Vs Pakistan | भारत-पाकिस्तान सिरीज होणार का? सौरव गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर