EPFO | आता PF बॅलन्स जाणून घेणे आणखी सोपे, 2 मिनिटात जाणून घ्या अकाऊंटमध्ये किती आहेत पैसे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | तुम्ही सुद्धा नोकरदार असाल आणि तुमचा PF कापला जात असेल तर तुम्ही या 4 पद्धतीने आपल्या प्रॉव्हिडंट फंडचा बॅलन्स चेक करू शकता. सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटी कर्मचार्यांच्या पीएफ खात्यात 8.5 टक्के दराने व्याज टाकले आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याचा बॅलन्स या 4 पद्धतीने घरबसल्या जाणून घेवू शकता, या पद्धती जाणून घेवूयात…
1- मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या बॅलन्स
पीएफ अकाऊंटचा बॅलन्स (PF Account Balance) एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.
2- SMS द्वारे बॅलन्स चेक करा
एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
3. EPFO वेबसाइटवर चेक करा बॅलन्स
- यासाठी EPFO वेबसाइटवर जा.
- येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
- आता View Passbook वर क्लिक करा.
- पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.
4. UMANG अॅपद्वारे ईपीएफ बॅलन्स चेक करा
- उमंग अॅप ओपन करा.
- यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडा.
- Employee Centric Services निवडा.
- आता UAN & PASSWORD टाका.
- यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल, तो टाका.
- यानंतर व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
Web Title : EPFO | pf account holders check your balance using this easy 4 ways
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Rains | पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसणार, मराठवाड्याला ‘अवकाळी’चा इशारा
Monalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले ‘गरम’