EPFO | कोरोना काळात पैशांची अडचण? ‘या’ पध्दतीनं तुम्ही काढू शकता तुमच्या PF अकाऊंटमधील रक्कम, जाणून घ्या पक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – देश सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या दुसर्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना काळात लोकांना पैशाची कमतरता भासत आहे. अशावेळी तुमच्या प्रोव्हिडंट फंड (PF) चा पैसा विदड्रॉ करू शकता. एम्पलॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायजेशन किंवा (EPFO ) ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation) ने महामारी पाहता दुसर्यांदा लोकांना पीएफ अकाऊंटमधून (PF account) अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा प्रदान केली आहे.
काय आहे ईपीएफओची नवी योजना/ऑफर
आदेशानुसार, पीएफ सबस्क्रायबर्सला तीन महिन्याची मुळ सॅलरी (बेसिक सॅलरी+महागाई भत्ता म्हणजे डीए) किंवा त्याच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेच्या 75 टक्केपर्यंत रक्कम (जे कमी असेल) काढण्याची परवानगी दिली आहे, ही रक्कम परत करण्याची आवश्यकता नाही. कमी रक्कमेसाठी सुद्धा अप्लाय करता येईल.
पीएफ अॅडव्हान्ससाठी कसे करायचे अप्लाय
ईपीएफओ पोर्टलवर जाऊन या पद्धतींना फॉलो करू शकता किंवा उमंग अॅपद्वारे सुद्धा क्लेम फाईल करू शकता.
– ईपीएफओचे युनिफाईड पोर्टल (https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface) च्या मेंबर इंटरफेसमध्ये लॉग इन करा.
– आता ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये जाऊन आणि क्लेम (फॉर्म-31,19,10सी, 10डी) वर क्लिक करा.
– आपल्या बँक अकाऊंटचे (Bank account) शेवटचे चार अंक टाका आणि व्हेरिफाय करा.
– नंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
– आता आऊटब्रेक ऑफ पेंडेमिक (कोविड-19) सिलेक्ट करा.
– जेवढ्या रक्कमेची गरज आहे, ती टाका.
– आता बँक अकाऊंटच्या चेकीची स्कॅन कॉपी अपलोड करा.
– Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि ओटीपी टाका.
– अशाप्रकारे तुमचा क्लेम सबमिट होईल आणि 3 दिवसांच्या आत बँक अकाऊंटमध्ये पैसे क्रडिट केले जातील.
Web Titel :- EPFO | pf epfo covid advance facility avail this facility in corona crisis know about process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले
पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर