home page top 1

6 कोटी PF खातेधारकांसाठी खुशखबर ! आता मिळणार 8.65 % व्याज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंंदाची बातमी असणार आहे. कारण केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या मते आर्थिक वर्ष 2019 – 19 साठी पीएफवर 8.65 टक्के व्याज मिळणार आहे. याचा फायदा 6 कोटी खातेधारकांना मिळेल. लवकरच नोकरी करणाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. मागील काही महिन्यापासून पीएफ खात्याच्या व्याज दराला सहमती मिळण्यावर चर्चा सुरु आहे. याआधी आर्थिक वर्ष 2017 – 18 मध्ये व्याजदर 8.55 टक्के होते. म्हणजेच आता व्याजदरात 0.10 टक्के वाढ होणार आहे.

EPFO लवकरच खातेधारकांच्या खात्यात व्याजाच्या दराने वाढलेली रक्कम मिळेल. 8.65 टक्क्यांचा दर सरकारच्या इतर छोट्या योजनांच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. छोट्या बचत योजनेचा परतावा मार्केट रेटवर आधारित असतो. ही संघटना 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे रिटर्न सेव्हिंग चे व्यवस्थापन करते.

EPF चे व्याजदर –
आर्थिक वर्ष 2017 – 18 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8.55 टक्के आहे.
तर 2016-17 ईपीएफचे व्याजदर कमी करुन 8.65 टक्के केले होते.
तर 2015 – 16 या वर्षात व्याजदर 8.80 टक्के होते.
त्यानंतर आता पीएफच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांने वाढ करणे विचाराधीन आहे.

काय आहे PF –
नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून एक हिस्सा पीएफ म्हणून कापला जातो. ही रक्कम PF खात्यात जमा होते. ही एक प्रकारची गुंतवणूक आहे.

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा देणारी ही योजना आहे. जी योजना EPFO कडून चालवण्यात येते. याचा व्याजदर सरकार ठरवते.

प्रत्येक महिन्याला कंपनी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून 12 टक्के पैसे कापून PF खात्यात टाकते. कर्मचाऱ्यांच्याबरोबरीने कंपनी देखील 12 टक्के पैसा कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात टाकते.

Loading...
You might also like