EPFO | कामाची गोष्ट ! पेन्शनधारकांसाठी ‘हा’ नंबर अत्यंत महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे पैसे; जाणून घ्या
नवी दिल्ली : एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत येणार्या पेन्शनधारकांना (Pensioners) एक यूनिक नंबर जारी केला जातो, ज्याच्या मदतीने निवृत्तीनंतर पेन्शन प्राप्त केली जाते. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) म्हटले जाते. कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणार्या व्यक्तीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) पीपीओ नंबर जारी केला जातो. निवृत्तीनंतर ईपीएफओ (EPFO) कर्मचार्याला एक पत्र जारी केले जाते, ज्यामध्ये पीपीओच्या डिटेल्स असतात. अशावेळी जर कुणी व्यक्तीने आपला पीपीओ नंबर हरवला तर तो आपल्या बँकेच्या मदतीने सहज प्राप्त करू शकतो. जाणून घ्या संदर्भातील प्रोसेस.
EPFO | ppo number get it with the help of bank account and pf number check know how
EPFO नुसार, जर कुणी व्यक्तीने आपला PPO नंबर हरवला तर तो आपल्या बँक अकाऊंट नंबर किंवा PF नंबरच्या मदतीने सहजपणे पुन्हा प्राप्त करू शकतो. याची प्रोसेस कशी आहे जाणून घेवूयात…
– सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निधी संघटनेची वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.
– आता लेफ्ट साईडमध्ये दिलेल्या ऑनलाइन सर्व्हिसेस सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.
– क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. या पेजवर लेफ्ट साईडला असलेल्या Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.
– येथे तो बँक अकाऊंट नंबर टाका, जो तुमच्या पेन्शन फंडशी लिंक्ड आहे. किंवा PF नंबर ज्यास मेंबर आयडी सुद्धा म्हणतात, तो टाकून सर्च करा.
– डिटेल्स यशस्वीपणे सबमिशननंतर PPO नंबर स्क्रीनवर दिसू लागेल.
असाही मिळवू शकतो पीपीओ नंबर
याशिवाय https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ला नवीन टॅबमध्ये उघडून सुद्धा पीपीओ नंबर प्राप्त करू शकता. पीपीओ नंबर संबधित माहिती प्राप्त करण्यासाठी ईपीएफओची वेगळी वेबसाइट आहे. येथे जीवन प्रमाणपत्र, पीपीओ नंबर, पेमेंटसंबंधी माहिती आणि पेन्शन स्टेटसबाबत माहिती प्राप्त करू शकता.
का आवश्यक आहे पीपीओ नंबर
नेहमी पासबुकवर पेन्शन ऑर्डर नंबर नोंदवून ठेवा. एका शाखेतून दुसर्या शाखेत पेंशन अकाऊंट ट्रान्सफर
केल्यानंतर पासबुकमध्ये पीपीओ नंबर नसतो, अशावेळी समस्या होऊ शकते. यामुळे पेन्शन जारी होण्यास
उशीर होऊ शकतो.
याशिवाय, जर तुमच्या पेन्शनसंबंधी एखादी तक्रार ईपीएफओमध्ये नोंदवायची असेल तर तिथे सुद्धा पीपीओ
नंबर देणे अनिवार्य आहे. ऑनलाइन पेन्शन स्टेटस जाणून घेण्यासाठी सुद्धा पीपीओ नंबरची आवश्यकता
असते.