संडे स्पेशल : 2019 मध्ये PF च्या नियमांमध्ये झाले ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या तुमचा काय होणार फायदा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निधि (EPFO) बचतीसाठीचा एक उत्तम पर्याय आहे. नोकरीच्या सुरुवातीला याची सुरुवात केली जाते. ईपीएफ खात्यामध्ये कर्मचारी आणि इम्प्लॉयर दोघांच्या माध्यमातून पगाराच्या 12.5 % रकमेचे योगदान केले जाते. ईपीएफओ एक अशा प्रकारच्या बचतीचा पर्याय आहे जो की एखाद्या व्यक्तीच्या मदतीने नोकरीच्या सुरुवातीला सुरु करता येतो. अनेक असे कर्मचारी आहेत ज्यांना प्रोविडेंट फंडमध्ये झालेल्या बदलांबद्दल माहित नसते. या वर्षी पीएफ नियमामध्ये अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

जाणून घेऊयात नव्या पीएफच्या नियमांमध्ये नेमके काय काय बदल झाले
ऑफलाइन पद्दतीने काढता येणार नाही पीएफचे पैसे
नव्या नियमानुसार ऑफलाईन पद्दतीने आता पैसे काढता येणार नाहीत. तसेच याबाबतचे काही नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. जर तुमचा आधार नंबर EPFO च्या युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) ला लिंक आहे तर तुम्ही PF काढण्यासाठी ऑफलाईन अर्ज करू शकत नाही. यावेळी तुम्हाला ऑनलाइन पद्दतीने अर्ज करावा लागेल.

एकसाथ काढून घेऊ शकता सर्व पैसे
EPFO ने कर्मचारी पेन्शन योजनेनुसार (EPS) पेन्शनच्या रकमेमध्ये काही हिस्सा सरळ घेण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे त्या पेन्शन धारकांना लाभ होईल ज्यांनी कम्युटेशन व्यवस्थेचा पर्याय निवडला होता आणि 2009 च्या आधी सेवानिवृत्तीसाठी रक्कम प्राप्त केली होती. त्यानंतर EPFO ने 2009 मध्ये या नियमाला मागे घेतले होते. ‘कम्युटेशन’ प्रणालीअंतर्गत, मासिक पेन्शन साधारणत पुढील 15 वर्षांच्या एक तृतीआंश मासिक पेन्शन वजा केली जाते आणि ही रक्कम निवृत्तीवेतन धारकाला एकदाच दिली जाते.15 वर्षानंतर निवृत्तीवेतन घेणाऱ्याला पूर्ण पेन्शन मिळण्याचा हक्क आहे.

केवळ ऑनलाइन क्लेम होणार सेटल
ईपीएफओने पैसे काढण्यासाठी नुकतेच ऑनलाइन नियम बदलले आहेत. या नियमानंतर आपण ऑफलाइन मोडमधून पीएफ व्यक्तिचलितपणे काढण्यात सक्षम होणार नाही. आता ईपीएफओ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारेल.

UAN मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधा
ईपीएफओने आता औपचारिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे, कर्मचारी स्वतःहून ऑनलाइन यूएएन प्राप्त करण्यास सक्षम असतील आणि यासाठी त्यांना आपल्या मालकावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता ते स्वतः ईपीएफओ वेबसाइटद्वारे स्वतः देखील अर्ज करू शकतात.

PRO साठी कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये डाउनलोड करण्याची सुविधा
EPFO ने लाखो पेन्शनधारकांसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर सारख्या पेन्शनशी निगडित कागद पत्रांना डिजिलॉकर मध्ये डाउनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे. ईपीएफओने यासाठी नॅशनल ई गवर्नेंस डिवीजन सोबत करार केला आहे.

जानेवारी पासून बदलणार PF चा हा नियम
1 जानेवारी 2020 पासून कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड बाबतचे नवीन नियम लागू होणार आहेत. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने यासाठी एक नोटिफिकेशन देखील जरी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत लक्ष देऊन EPFO ने हे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरमधील पीएफ न कटणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/