‘सरकारी’ नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी ‘सुवर्णसंधी’ ! EPFOमध्ये पदवीधरांसाठी २१८९ जागा, २५००० पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी २१८९ जागावर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवू इच्छित असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर यासंबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे.

जे उमेदवार या पदासाठी अर्ज करु इच्छितात त्यांना ३ टप्प्यात ही परिक्षा द्यावी लागेल. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०१९ असणार आहे.

पदांच्या भरती संबंधित माहिती –
पदाचे नाव – सोशल सिक्युरिटी असिस्टंट
एकूण पदांची संख्या – २१८९ पद
शैक्षणिक पात्रता – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची टाइपिंग स्पीड ५००० शब्द प्रति तास असणे आवश्यक आहे
वयाची मर्यादा – १८ – २७
पगार – २५ हजार प्रति महिना
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड प्री परिक्षा, मुख्य परिक्षा आणि कौशल्य परिक्षण अशा स्वरुपाची असेल.
परिक्षा शुल्क –
जनरल – ५०० रुपये
एससी, एसटी, पीडब्युबीडी, महिला आणि माजी कर्मचारी – २५० रुपये
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – epfindia.gov.in

आरोग्य विषयक वृत्त

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय