EPFO Rules | PF खातेधारकांनी तात्काळ अपडेट करावी वारसदाराची माहिती, अन्यथा होईल 7 लाखाचे नुकसान; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि EPS (Employee Pension Scheme) च्या बाबतीत नॉमिनेशन करणे आवश्यक आहे. जेणेकरून EPFO मेंबरचा मृत्यू झाल्यास नॉमिनी (Nominee) ला हा फंड वेळेवर उपलब्ध होऊ शकतो. EPFO मेंबर्सच्या इन्श्युरन्स कव्हरची सुद्धा सुविधा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत मिळते. स्कीममध्ये नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचा इन्श्युरन्स कव्हर दिले जाते.
ई नामांकन सुविधा (E-nomination) सुरू
नॉमिनेशन केलेले नसल्यास सदस्याच्या मृत्यूनंतर क्लेम करण्याची प्रोसेस कठिण होते. ऑनलाइन माध्यमातून नॉमिनेशन डिटेल्स कसे भरावे ते जाणून घेवूयात. ईपीएफओने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई नामांकनाची सुविधा सुरू केली आहे. ऑनलाइन नॉमिनीचे नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती अपडेट केली जाते.
असे करा EPF/EPS ई-नॉमिनेशन
– EPFO वेबसाइटवर जाऊन ‘सर्व्हिसेस’ सेक्शनमध्ये ‘फॉर इम्प्लॉइज’वर क्लिक करा.
– आता ‘मेंबर UAN/ऑनलाइन सर्व्हिस (ओसीएस/ओटीसीपी) वर क्लिक करा.
– आता यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
– ‘मॅनेज’ टॅबमध्ये ‘ई-नॉमिनेशन’ सिलेक्ट करा.
– यानंतर स्क्रीनवर ‘प्रोव्हाईड डिटेल्स’ टॅब येईल, ‘सेव्ह’वर क्लिक करा.
– फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘यस’वर क्लिक करा.
– आता ‘अॅड फॅमिली डिटेल्स’वर क्लिक करा. एकपेक्षा जास्त नॉमिनी अॅड करू शकता.
– कोणत्या नॉमिनीच्या वाट्याला किती अमाऊंट येईल, यासाठी ‘नॉमिनेशन डिटेल्स’ वर क्लिक करा. यानंतर ‘सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन’वर क्लिक करा.
– ओटीपी जनरेट करण्यासाठी ‘ई-साइन’वर क्लिक करा. ओटीपी आधारसोबत लिंक मोबाइल नंबरवर येईल.
– ओटीपी योग्य ठिकाणी भरा.
Web Title : EPFO Rules | pf account holders add nominee details in your account otherwise loss of rs 7 lakh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update