EPFO नंतर कोणत्या Saving Schemes मध्ये मिळते सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | देशात सर्वात जास्त व्याजदर कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) पीएफवर मिळतो. परंतु, ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने पीएफवरील व्याज आर्थिक वर्ष 2021 – 22 साठी 8.5 टक्केवरून कमी करून 8.1 करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला दिला आहे. ज्यानंतर ईपीएफओच्या पीएफवर मिळणारा व्याजदर 0.4 टक्के कमी होईल. (Interest On PF Account)
EPFO च्या PF वर 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. अलीकडच्या काळात देशातील लहान बचत योजनांच्या (Small Saving Schemes) व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. या योजनांवरील व्याजदरांबद्दल जाणून घेऊया.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizen Saving Scheme (SCSS) :
ही बचत योजना केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील कोणताही ज्येष्ठ नागरिक त्याच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 7.4 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये तुम्ही कमाल 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. (EPFO)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund (PPF) :
या योजनेअंतर्गत, देशातील कोणताही नागरिक बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याचे पीपीएफ खाते उघडू शकतो. PPF वर सध्याचा व्याजदर 7.1 टक्के आहे. यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.
किसान विकास पत्र Kisan Vikas Patra (KVP) :
ही योजना पोस्ट विभागाने 1988 मध्ये सुरू केली होती. तुम्ही किसान विकास पत्रामध्ये किमान एक हजार रुपये गुंतवू शकता, तर कोणतीही उच्च गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत, तुम्हाला प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत 6.9 टक्के व्याजदरासह प्राप्तीकर सूट मिळते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र National Savings Certificate (NSC) :
ही पोस्ट विभागामार्फत चालवली जाणारी एक लोकप्रिय योजना आहे. यामध्ये सध्या 6.8 टक्के व्याज दिले जात आहे. एनएससीचा लॉक – इन कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत प्राप्तीकर कलम 80 सी मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट आहे.
मुदत ठेव Fixed Deposit (FD) :
गेल्या दहा वर्षांत देशाच्या एफडीवरील व्याजदरात कमालीची घट झाली आहे. 2010 – 11 मध्ये जिथे 9 ते 10 टक्के व्याज मिळत होते, ते आता सरासरी 6 टक्क्यांवर आले आहे.
Web Title :- EPFO | saving schemes get the highest interest after epfo know the details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update