अलर्ट ! PF अकाऊंटमधील पैसे काढणं होईल ‘कठीण’, लवकरच उरकून घ्या ‘हे’ महत्वाचं काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक नोकरदाराला त्याच्या सुरक्षित भविष्यासाठी पीएफ किती आवश्यक आहे याची जाणीव असते. यामुळेच कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. ईपीएफओच्या प्रयत्नाने आज अनेक जण ऑनलाइन क्लेम आणि सेटलमेंट करु शकत आहेत.
परंतु अद्याप असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपली केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परंतु आता अशा लोकांना पीएफ खात्यातील पैसे काढणे अवघड होऊ शकते. केवायसीसाठी ईपीएफओकडून वेळोवेळी अलर्ट पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही केवायसी केली नसेल तर तात्काळ केवायसी करुन घ्या, अन्यथा तुमचे पीएफमधील पैसे अडकून राहू शकतात.
असे करा केवायसी –
1. सर्वात आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जा.
2. येथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला केवासयीचा पर्याय दिसेल.
3. त्यावर क्लिक करा, तेथे पॅन, आधार, मोबाइल नंबर, बँक अकाऊंट याची कॅटेगिरी दिसेल.
4. यात मागण्यात येणारी माहिती सबमिट करा.
5. सबमिट केल्यानंतर व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीला सांगावे लागेल.
6.कंपनीला व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
ईपीएफओने ‘Date of Exit’ पर्याय सुरु केला आहे. आता तुम्ही नोकरी सोडल्याची तारीख स्वत: एंटर करु शकतात. आता या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या जुन्या कंपनीवर किंवा संस्थेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लोकांना पीएफमधील फंड काढण्यास अडचणी येत होत्या, परंतु या सुविधेमुळे ते ही सोपे झाले आहे.