खुशखबर ! EPFO मुळं होणार 8 कोटी लोकांना ‘हा’ फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक नोकरदाराला सुरक्षित भविष्यासाठी पीएफ फंडचा किती उपयोग होतो याची जाणीव असते. त्यामुळे अनेक लोक नोकरी दरम्यान पीएफच्या पैशांचा वापर करत नाही. तर काही लोक अत्पकालीन परिस्थितीत या फंडमधील पैशांचा वापर करतात. ईपीएफओच्या प्रयत्नाने आता पीएफ फंडचा वापर करणं आधिक सोपं झालं आहे.

आता तुम्ही पीएफच्या पैशांसाठी ऑनलाइन क्लेम करु शकतात. याशिवाय पीएफ पासबुकचा बॅलेंस चेक करु शकतात तसेच इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात. या सुविधेनंतर आता ईपीएफओने आणखी एक खास सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत नोकरी सोडण्याची तारीख म्हणजे ‘Date of Exit’ स्वत: नोंदवू करु शकतात. आतापर्यंत यासाठी नोकरदारांना आपल्या जुन्या कंपनी किंवा संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे लोकांचा पीएफ फंड अडकून राहत असेल. परंतु या सुविधेमुळे आता पीएफ हाताळणे सोपे झाले आहे.

असे नोंदवा Date of Exit –
– सर्वात आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ लिंकला भेट द्या.
– येथे UAN आणि पासवर्डच्या आधारे लॉन इन करा.
– त्यानंतर नवे पेज ओपन होईल. तेथे मॅनेज सेक्शनवर जावे.
– येथे ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये ‘Mark Exit’ दिसेल. या यादीतील पीएफ खाते क्रमांक निवडावा लागेल.
– यानंतर नोकरी सोडण्याची तारीख आणि कारणासंबंधित माहिती द्यावी लागेल.
– त्यानंतर खाली ओटीपी जनरेट करावा लागेल.
– त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल. ज्याला एंटर करुन अपडेट वर क्लिक करा.
– त्यानंतर Date of Exit अपडेटेशनचा मेसेज येईल.
– त्यानंतर तुम्ही सर्विस हिस्ट्री सेक्शनमध्ये जाऊन अपडेटेशन चेक करु शकतात.

नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या अंशदानासाठी 2 महिन्यानंतर तुम्ही तारीखेची नोंदणी करु शकतात. या नव्या सुविधेचा फायदा ईपीएफओच्या 8 कोटी सब्सक्रायबर्सला होईल.

फेसबुक पेज लाईक करा –