PF खातेदारांसाठी खुशखबर ! EPFO ने WhatsApp वर सुरु केली ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएफ खातेदारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार, EPFO ने आपल्या PF खातेदारांसाठी व्हॉट्सऍप हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. या नव्या सुविधेमुळे PF खातेदाराला अकाउंटसंबंधी सर्व माहिती मिळणार असून, अडचणीही दूर होऊ शकतील.

PF खातेदारांना यापूर्वी EPFO ऑफिसमध्ये जाऊन चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, आता यापासून दूर राहता येणार आहे. EPFO ची ही सुविधा व्हॉट्सऍप हेल्पलाईन सेवा 138 क्षेत्रीय कार्यालयात सुरु करण्यात आल्या आहेत. EPFO खातेदारांना व्हॉट्सऍप मेसेज करून तक्रार नोंदवता येऊ शकणार आहे. मात्र, त्यासाठी विविध क्षेत्रासाठी वेगवेगळे क्रमांक असणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नंबर जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/WhatsApp_Helpline.pdf  वर जाऊन माहिती घेता येऊ शकते.

तसेच PF व्हॉट्सऍप क्रमांक EPFO शिवाय इतरही फिचर्स पाहिला मिळू शकतात. ज्यामध्ये EPAIGMS यांसारख्या सुविधा मिळू शकतील. या सर्व सुविधा PF खातेदारांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कमाईची पूर्ण रक्कम मिळण्यास मदत होऊ शकते.