PF खातेधारकांनो सावधान ! ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर रिकामं होईल तुमचं अकाउंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंथा – बँका आपल्याला नेहमी अशी सूचना देतात की, तुमच्या बँक खात्याची माहिती आणि पासवर्ड कुणालाही सांगू नका, तसेच अन्य अ‍ॅप अथवा फोन कॉलवर कुणालाही माहिती देऊ नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनेही (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना अशाप्रकारची माहिती इतरांना न देण्याचे आवाहन केले आहे. हा अ‍ॅलर्ट ईपीएफओच्या वेबसाईटवर ठळकपणे दर्शवला जात आहे.

आपल्या सूचनेत भविष्य निर्वाह निधी संस्थेने म्हटले आहे की, ईपीएफओ तुम्हाला व्यक्तीगत माहिती जसे की, आधार, पॅन, यूएएन, बँक स्टेटमेंट इत्यादी फोनवर मागत नाही. ईपीएफओ कधीही कोणत्याही सदस्याला कॉल करत नाही. कृपया, अशा खोट्या कॉलला उत्तर देऊ नका.

आतापर्यंत प्रामुख्याने बँका आणि अन्य वित्तसंस्था ग्राहकांना ओटीपी, डेबिट अथवा के्रडिट कार्ड आणि अन्य वैयक्तिक माहिती कुणालाही न देण्याची सूचना देत होत्या. कारण अनेक हॅकर्स बँक ग्राहकांना फोन करून बँक कर्मचारी असल्याचे भासवून त्यांची माहिती घेवून फसवणूक करू लागले होते. आता ईपीएफओनेही आपल्या सदस्यांना अशाप्रकारची सूचना जारी केली आहे.

फोन करणारे हॅकर्स स्व:ताला ईपीएफओचे अधिकारी असल्याचे सांगून ईपीएफ खात्याची माहिती मागत असावेत अशी, शक्यता वर्तविली जात आहे.

ईपीएफ सदस्य आपल्या खात्यातून कर्ज सुद्धा घेऊ शकतात. पीएफ खात्याद्वारे घर खरेदीसाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे ईपीएफओची स्व:ताची हाऊंसिंग स्किममध्ये आणि दुसरा पर्याय म्हणजे खात्यातून काही रक्कम काढून सदस्य घर खरेदी करू शकतात. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील प्रत्येक कर्मचार्‍याचे पीएफ खाते असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने कायद्यात सुधारणा करून 12 एप्रिल 2017 ला आपल्या सदस्यांना हाऊसिंग स्किमची तरतूद केली आहे. याचा फायदा ईपीएफओचे सुमारे सहा कोटी सदस्य घेऊ शकतात. याअंतर्गत घर खरेदी, अथवा बांधण्यासाठी, प्लॉट खरेदीसाठी कर्मचारी आपल्या निधीतून 90 टक्के रक्कम काढू शकतो.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/