ईपीएफ(EPF)च्या ८.५ कोटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठा ‘झटका’ देण्याच्या तयारीत ; होणार ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) च्या ८.५ कोटी अंशदारकांना केंद्र सरकार मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. यामुळे लोकांच्या पीएफ खात्यावरील जमा रकमेवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

वित्त मंत्रालयाने दिला प्रस्ताव :

सूत्रांच्या माहितीनुसार वित्त मंत्रालयाने ईपीएफ च्या कार्यालयास दिलेल्या प्रस्तावानुसार पीएफ च्या जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजात कपात करण्यात यावी अशी शिफारस आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पीएफ खात्यावर मिळणारे व्याज बँकांमधील खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा बरेच जास्त आहे त्याला बँक खात्यावर मिळणाऱ्या व्याजाएवढे करायला हवे.

बँकांवर होतोय परिणाम :

वित्त मंत्रालयातील सूत्रांच्या सांगण्यानुसार पीएफच्या असणाऱ्या जास्तीच्या व्याजदरामुळे बँक सुद्धा कर्जावर लावले जाणारे व्याज कमी करू शकत नाहीये. आत्ता ईपीएफओ ८.६५ टक्के या दराने व्याज देत आहे तर बँकांमधील बचत खात्यावर मिळणारे व्याज मात्र केवळ ४ ते ६ टक्के इतके आहे. एफडी मध्ये मात्र बँक ६ ते ८ टक्के व्याज देते.

कर्जावरील व्याजदर जास्त :

बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावर नागरिकांना बचत खात्यापेक्षा जास्त व्याज द्यावे लागते. रिजर्व बँकेने यासाठी रेपो रेट मध्ये ७५ बेसिस पॉईंट ची कपात केली आहे. कामगार मंत्रालयाने सांगितले कि यासंदर्भात वित्त मंत्रालयाशी बोलणी सुरु असून लवकरच यामध्ये तोडगा काढला जाईल.

उत्पन्नापेक्षा ईपीएफओ चा खर्च जास्त :

२०१६-१७ पासून ईपीएफओ च्या उपलब्ध ऑडिट रिपोर्ट नुसार उत्पन्नापेक्षा या खात्याचा खर्चच जास्त असल्याचे दिसते. याची अधिक सखोल माहिती मात्र उपलब्ध नाही. वित्त मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार याआधी देखील आम्ही सरप्लस फंड म्हणजेच उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाचा प्रश्न कामगार मंत्रालयाकडे मांडला होता. अधिकाऱ्याने पुढे म्हटले की जर ईपीएफओ ला यात काही बदल करावा लागला आणि ग्राहकांना नुकसान झाले तर ग्राहकांच्या पैशाचा भरणा करण्याची जबाबदारी सरकारची असेल. ईपीएफओकडे सध्या लाख कोटी इतका फंड आहे.

ईपीएफओ च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ज्या पद्धतीने पीएफ खात्यांवरील व्याजदर ठरवले जाते ती आत्ताची किंवा नवी नसून भरपूर जुनी आहे. मागील २० वर्षांपासून याच पद्धतीने व्याजदराची गणना केली जाते. यासंदर्भात वित्त मंत्रालयाने काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची योग्य उत्तरे दिली जातील.

आरोग्यविषयक वृत्त

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ” 

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे 

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

सिनेजगत

अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘तसं न केल्यामुळे गमावले अनेक चित्रपट’

ब्रेकिंग : अभिनेता आदित्य पांचोलीवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा

‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’