EPFO संदर्भात कोणताही ‘प्रश्न’, ‘संशय’ आणि ‘तक्रार’ असल्यास ‘इथं’ करा संपर्क, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या लोकांना पीएफ संबंधित अनेक समस्या येत आहेत. पीएफमध्ये अंशदान, बॅलेंस, रक्कम काढणे किंवा टॅक्स कापणे यासंबंधित अनेक प्रश्न उपस्थित होतात. अनेकदा प्रोसेसिंगवेळी अडचण आल्याने काही तक्रार करायची असते. परंतु यावेळी तक्रार कुठे करायची असा प्रश्न पडतो. याच कारणाने EPFO ने दर महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या कार्यालयात ‘निधी तुमच्याजवळ’ (PF Near You) या कार्यक्रमाचे आयोजन करत असते. येथे तुम्ही तक्रार दाखल करु शकतात.

उद्देश्य –
1) आपल्या सब्सक्रायबर्सपर्यंत पोहचण्यासाठी ईपीएफओ हा कार्यक्रम राबवत आहे. दर महिन्याच्या 10 तारखेला ईपीएफओ देशभरात 135 क्षेत्रीय कार्यालयात याचे आयोजन करते.

2) या कार्यक्रमाद्वारे कर्मचारी, नियोक्ता आणि पेंशनर्स एकाच मंचावर येतील.

3) या कार्यक्रमादरम्या कर्मचाऱ्यांच्या हिताची पावले उचण्यात येतील.

4) कर्मचारी येथे त्यांच्या शंका, प्रश्न, समस्या उपस्थित करु शकतात.

फीचर्स –
1) मेंबर्स आणि पेंशनर्स दोघांना याचा फायदा होईल.

2) तक्रार निवारण प्रणाली मजूबत होईल.

3) विभागाचे कर्मचारी आणि नियोक्तांचे मत ऐकून घेता येईल, ज्यामुळे सेवा उत्तम होण्यास मदत होईल.

ईपीएफओचे क्षेत्रीय कार्यालय असे शोधा –
1. वेबसाइटच्या माध्यमातून –
  – ईपीएफओच्या वेबसाइटला भेट द्या
  – Contact Us वर क्लिक करा
  – राज्य निवडा

2. अ‍ॅपच्या माध्यमातून –
  – उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा
  – ईपीएफओ निवडा
  – General Services हा पर्याय निवडा
  – सर्च ईपीएफओ ऑफिस मध्ये जा
  – राज्य किंवा जिल्हा निवडा

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/