EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! जुलैच्या ‘या’ तारखेला PF अकाऊंटमध्ये येईल मोठी रक्कम, इथं चेक करा बॅलन्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) मेंबर आहात तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. या महिन्यात तुमच्या पीएफ (PF Account) मध्ये जास्त पैसे येणार आहेत. EPFO मेंबर्सला लवकरच पीएफवर व्याज मिळू शकते. सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जुलैच्या अखेरीस PF चे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. होय, ईपीएफओ आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला पाठवले जाऊ शकते. यासाठी असा जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलन्स…
1. SMS द्वारे चेक करा
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
2. मिस्ड कॉलद्वारे
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल
3. ऑनलाइन चेक करा
– ईपीएफओच्या www.epfindia.gov.in वेबसाइट वर जा.
– आता Our Services टॅबमधून For Employees पर्यायावर क्लिक करा.
– Services टॅबपैकी Member Passbook वर क्लिक करा.
– यानंतर लॉग-इन करण्यासाठी UAN आणि पासवर्ड नोंदवा आता आपल्या पीएफ अकाऊंटचे पासबुक पाहू शकता.
Web Title :- epfo subscribers get 8 5 percent interest rate on pf account on july check balance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर