EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम
नवी दिल्ली : EPFO |आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सबस्क्रायबर्ससाठी आपले पीएफ अकाऊंट आधारसोबत लिंक करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंतचा वेळ आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सर्व पीएफ UAN (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आधारसोबत लिंक करणे अनिवार्य केले आहे. अगोदर याची डेडलाइन 1 जून 2021 ठरवली होती, जी आता वाढवून 1 सप्टेंबर केली आहे.
कामगार मंत्रालयाने सोशल सिक्युरिटी कोड, 2020 चे सेक्शन 142 अंतर्गत हा नियम लागू केला आहे. सेक्शन 142च्या तरतूदी अंतर्गत, एखाद्या संघटीत किंवा असंघटीत क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्याला सोशल सिक्युरिटी कोडच्या अंतर्गत सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारद्वारे आपली ओळख पटवून द्यावी लागेल.
सर्व प्रकारचे बँक अकाऊंट, पीपीएफ अकाऊंट (PPF Account) आणि ईपीएफ अकाऊंटसोबत (EPF Account) पॅन (PAN Card) आणि आधार (Aadhaar Card) लिंक करणे बेसिक KYC प्रक्रियेचा भाग आहे. जर असे केले नाही तर कर्मचार्याच्या पीएफ खात्यात व्याज जमा होणार नाही आणि तो विड्रॉल क्लेम करू शकणार नाही.
ECR फायलिंगची तारीख वाढली
सरकारने इलेक्ट्रॉनिक चलान कम रिसिप्ट (ECR) किंवा पीएफ रिटर्नला आधार व्हेरिफाईड यूएएनला लागू करण्याची तारीख सुद्धा 1 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.
मिळणार नाही ईपीएफ अकाऊंटचा लाभ
जर एखाद्या कर्मचार्याने ईपीएफ खात्यात आधार डिटेल्स अपडेट केल्या नाहीत तर त्यास या स्कीम अंतर्गत कोणताही लाभ मिळू शकणार नाही. यामध्ये कोविड-19 अॅडव्हान्स आणि पीएफ अकाऊंटशी लिंक इंश्युरन्स बेनिफिटचा सुद्धा समावेश आहे.
ईपीएफ अकाऊंटमध्ये आधार डिटेल्स अपडेट का आवश्यक
ईपीएफओ आपल्या सबस्क्रायबर्सचे सर्व कामकाज ऑनलाइन करण्याची तयारी करत आहे. यामध्ये
केवायसी अपडेट करणे, अॅडव्हान्स किंवा विड्रॉलच्या अर्जासह सर्व प्रकारच्या फायद्यांचा समावेश
आहे. अशावेळी सबस्क्रायबर्सची ओळख व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. यासाठी ईपीएफ
अकाऊंटमध्ये आधार अपडेट करणे अनिवार्य केले आहे.
Shikshan Sevak Recruitment | जम्बो भरती ! राज्यातील शिक्षण सेवकांची 6100 रिक्त पदे भरणार