EPFO | 6 महिन्यापेक्षा कमी झाली असेल नोकरी तर EPS मधून काढू शकता का पेन्शनचे पैसे?, जाणून घ्या EPFO चे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  कोरोना (Corona) महामारीदरम्यान प्रॉव्हिडंट फंड (provident fund) सदस्यांना दिलासा देण्यासाठी EPFO ने त्यांना आपल्या खात्यातून पैसे काढण्याची सूट दिली आहे. ज्या अंतर्गत ते 3 महिन्यांची बेसिक सॅलरी (Basic Salary) किंवा एकुण जमा रक्कमेच्या 75 टक्के पैसे काढू शकतात. पण पीएफ (PF) शिवाय पेन्शनमध्ये जमा होत असलेला फंड सुद्धा काढता येऊ शकतो का, विशेषता नोकरी करताना अवघे 6 महिनेच झाले असतील. अशावेळी ईपीएफओच्या नियमांची (EPFO Rules) माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. EPFO | when can eps pension withdrawal know epfo rules if employee were in 6 months job

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नोकरीच्या 6 महिन्यांच्या आत पैसे काढणे अवघड

ईपीएफओ (EPFO) नियमानुसार जर कर्मचार्‍याने 6 महिन्यापेक्षा कमी नोकरी केली असेल तर त्यास पेन्शनचे (Pension) पैसे काढण्यात अडचण येऊ शकते. नियमानुसार 6 महिने म्हणजे 180 दिवसाच्या ड्यूटीपेक्षा (Duty) कमी आहे तेव्हा केवळ PF ची रक्कम काढू शकता. परंतु पेन्शनमध्ये (Pension) जमा रक्कम मिळणार नाही.

10 वर्षानंतर मिळेल पेन्शनाचा अधिकार

जर तुमची नोकरी 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त झाली आहे तर तुम्हाला पेन्शनचा हक्क आहे. कारण 10 वर्षाची नोकरी झाल्यास पेन्शन (Pension) मिळू शकते. मात्र, पेन्शनचा लाभ तेव्हाच सुरू होईल जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल. या पेन्शनचा लाभ 58 वर्षानंतर पासून तुम्हाला आयुष्यभर मिळेल. यापूर्वी आवश्यकता भासल्यास पीएफची रक्कम (PF Amount) काढू शकता.

Web Title : EPFO | when can eps pension withdrawal know epfo rules if employee were in 6 months job

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aamir khan Announces Divorce | आमिर खान आणि किरण राव यांच्यात ‘फारकत’, लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेणार घटस्फोट

Mutilated Notes | ATM मधून निघाली फाटकी नोट तर ‘या’ पध्दतीनं बदला, केवळ काही मिनिटात होईल काम; जाणून घ्या