मोदी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’ ! 6 कोटी PF खातेदारांना आता मिळणार 10 लाखांचं विमा संरक्षण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार नोकरदारांना लवकरच नवं गिफ्ट देणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)आपल्या सदस्यांसाठी जीवन विमा (Life Insurance) संरक्षणाची रक्कम वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. CNBC आवाजच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. विमा संरक्षण रक्कम 6 लाख रुपयांवरून वाढवून 10 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (Central Board of Trustees)च्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

किमान संरक्षण रक्कम 2.5 लाख रुपयांवरून वाढवून 4 लाख रुपये होऊ शकते. दोन टप्प्यांत विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. EPFO खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेशिवाय (EPS) जीवन विमा संरक्षणाचा आणखी एक मोठा फायदा मिळतो. EPFOच्या सर्व खातेदारांना 1976 (EDLI) अंतर्गत विमा संरक्षण पुरवलं जातं.

काय आहे EDLI योजना ?
EPF मध्ये तुमचा 12 टक्के पैसा जमा होतो. त्याप्रमाणे यातील काही रक्कम EPF आणि पेन्शनमध्येही जात असते. EDLI (Employees Deposit Linked Insurance) या योजनेअंतर्गत कंपनीकडूनही 0.50 टक्के योगदान दिलं जातं.

EDLI योजनेअंतर्गत किती रक्कम मिळते ?
पीएफ खातेदाराचा आजारपण किंवा दुर्घटनेत मृत्यू झाला तर, खातेदाराचा वारस त्यातील रक्कम काढू शकतो. खातेदाराला यासाठी कोणतीही अतिरीक्त रक्कम द्यावी लागत नाही. EDLI योजनेअंतर्गत 6 लाख रुपयापर्यंतचा संरक्षण विमा खातेदाराच्या वारसाला मिळतो.

अशी मोजा खात्यातील जमा रक्कम
कर्मचाऱ्याच्या खात्यात शेवटच्या पगारापर्यंत EDLI योजनेअंतर्गत एक ठराविक रक्कम जमा होत असते. तुम्हाला EPFO कडून 1.50 लाख बोनसही दिला जातो. याशिवाय EDLI मध्ये पगाराची मर्यादा 15 हजार रुपये असते. अशा प्रकारे एकूण 6 लाख रुपये काढण्याचा दावा केल्यास [(30 x15,000) + 1,50,000] अशा प्रकारे पैसे मिळवता येतात.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास