EPFO | तुमच्या PF अकाऊंटमध्ये व्याज आले का? ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने काही दिवसांपूर्वीच ईपीएफओ सदस्यांसाठी आपल्या भविष्य निधीशी (PF) संबंधित माहिती पोहचवण्याची पद्धत सोपी बनवण्यासाठी अनेक बदल केले आहेत. आता, ईपीएफओ अंशधारकांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस आपल्या कंपनीकडून आपली ईपीएफ माहिती सामायिक करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. आता ईपीएफ खातेधारक पाहिजे तेव्हा आपला पीएफ बॅलन्स (PF balance) ऑनलाइन जाणून घेऊ शकतात.
आता, ईपीएफओ (EPFO)ग्राहक प्रत्येक तिमाहीनंतर आपल्या खात्यात ईपीएफ व्याज वितरणानंतर आपला ईपीएफ बॅलन्स जाणून घेवू शकतात (How to check PF balance).
ईपीएफओद्वारे करण्यात आलेल्या अलिकडच्या बदलांनुसार, एक ईपीएफओ सदस्य आपला पीएफ बॅलन्स चार प्रकारे जाणून घेवू शकतो.
उमंग अॅपद्वारे ईपीएफ बॅलन्स चेक करा
प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा.
आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून चेक करा पीएफ बॅलन्स
यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा.
यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.
एसएमएसद्वारे करा ईपीएफ बॅलन्स चेक
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा.
एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल.
ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
मिस्ड कॉलने चेक करा पीएफ बॅलन्स
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता.
यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.
Web Title : EPFO | will the interest come in your pf account you can check in these four ways
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपये दंड