EPFO | बँक अकाऊंट आणि PF नंबरद्वारे जाणून घेवू शकता PPO नंबर; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंड संचालित करणारी संस्था EPFO कडून प्रत्येक निवृत्त होणार्या कर्मचार्याला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO), भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शनच्या वितरणाच्या माहितीसह एक पत्र पाठवले जाते. PPO 12 अंकांचा एक युनिक नंबर असतो, जो पेन्शन प्राप्त करण्यास मदत करतो.
याशिवाय, प्रत्येक वर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला जमा करताना या PPO नंबरची माहिती देणे आवश्यक आहे. PPO नंबर मुळप्रकारे केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाला (सीपीएओ) करण्यात आलेल्या कोणत्याही संपर्कासाठी एक संदर्भ क्रमांकासारखा असतो.
प्रत्येक पेन्शनधारकाने आपला पीपीओ नंबर लक्षात ठेवणे आवश्यक असते. जर पेन्शन धारक हा नंबर विसरला किंवा कागद हरवला तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संबंधी बँक खाते नंबरचा वापर करून किंवा आपल्या पीएफ नंबरचा (PF Account Number) वापर करून तो प्राप्त करू शकता.
EPFO ने याबाबत एक ट्विट करत हे समजावले आहे की, आपला बँक अकाऊंट नंबर किंवा पीएफ नंबरचा वापर करून कशाप्रकारे पीपीओ नंबर प्राप्त करता येऊ शकतो. PPO नंबर प्राप्त करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेवूयात…
अशाप्रकारे प्राप्त करू शकता PPO नंबर
सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निधी संघटनेची वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा. आता लेफ्ट साईडमध्ये दिलेल्या ऑनलाइन सर्व्हिसेस सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. या पेजवर लेफ्ट साईडला असलेल्या Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.
येथे तो बँक अकाऊंट नंबर टाका, जो तुमच्या पेन्शन फंडशी लिंक्ड आहे.
किंवा PF नंबर ज्यास मेंबर आयडी सुद्धा म्हणतात, तो टाकून सर्च करा.
डिटेल्स यशस्वीपणे सबमिशननंतर PPO नंबर स्क्रीनवर दिसू लागेल.
Web Title :- EPFO | you can find ppo number through bank account and pf number know step by step process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update