Equity Mutual Funds | ‘या’ 5 ‘इक्विटी फंडां’नी दिला 119 पट नफा ! 1 लाखाचे झाले 1.2 कोटी रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Equity Mutual Funds | जर तुम्ही सुद्धा मोठी रक्कम जमवण्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर सर्व पर्यायांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Funds) सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक असे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, ज्यांच्यात मोठ्या कालावधीत (Long Term Investment) गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा मिळाला आहे. आम्ही असे 5 असेच इक्विटी फंड्स सांगणार आहोत, ज्यांच्यात मोठ्या कालावधीसाठी पैसे लावलेले गुंतवणुकदार मालामाल झाले. या योजनांमध्ये 20 वर्षादरम्यान वार्षिक 23.8 ते 27 टक्के नफा मिळाला आहे. यामध्ये पैसे लावणार्‍या लोकांच्या भांडवलात 20 वर्षाच्या आत 72 ते 119 पट वाढ दिसून आली आहे.

*  Nippon India Growth fund

मोठा नफा देणार्‍या इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या यादीत निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (Nippon India Growth fund) चे नाव सर्वांत वर आहे.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड सर्वात जुन्या मिडकॅप योजनांपैकी एक आहे.
जी 1995 मध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडद्वारे सुरूकरण्यात आली होती.
त्याने 20 वर्षात वार्षिक 27 टक्केचा आश्चर्यकारक रिटर्न दिला आहे.
या 20 वर्षात पैसे 119 पट वाढले. जर एखाद्याने 2001 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते वाढून जवळपास 1.2 कोटी रुपये झाले असते.

*  Franklin Prima ने केले मालामाल

फ्रँकलिन प्रायमाने 20 वर्षात 26.1 टक्के रिटर्न दिला आहे. ही योजना सुद्धा एक मिडकॅप फंड आहे आणि तो 1993 मध्ये सुरू केला होता.
जर एखाद्याने 2001 मध्ये फ्रँकलिन प्रायमामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज 1.03 कोटी रुपये मिळाले असते.

*  ICICI Pru च्या फंडने दिला मजबूत रिटर्न

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडने 20 वर्षात वार्षिक 24 टक्के रिटर्न दिला आहे. 2001 मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणार्‍याला आता 74.2 लाख रुपये मिळाले असते.
ही योजना प्रामुख्याने सॉफ्टवेयर सेवा कंपन्यांच्या शेयरमध्ये गुंतवणूक करते. (Equity Mutual Funds)

 

*  एसबीआयच्या 2 फंडने करून दिली शानदार कमाई

एसबीआय मॅग्नम ग्लोबल फंड (SBI Magnum Global fund) ने सुद्धा 20 वर्ष वार्षिक आधारावर 24 टक्केचा रिटर्न दिला आहे.
या फंडची सुरुवात 1994 मध्ये झाली होती. आजपासून 20 वर्षापूर्वी जर तुम्ही या फंडात 1 लाख रुपये टाकले असते तर आज 74.2 लाख रुपये झाले असते.
तर, एसबीआय काँट्रा (SBI Contra) फंडने 20 वर्ष आधारावर 23.9 टक्के रिटर्न दिला. हा फंड 1994 मध्ये सुरू झाला होता.
या फंडमध्ये 20 वर्षापूर्वी लावलेले 1 लाख रुपये आता 72.2 लाख रुपये झाले आहेत. (Equity Mutual Funds)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Equity Mutual Funds | earn money from 5 equity funds which gave 119 times profit as 1 lakh convert into 12 crore rupees check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले

’आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

MP Accident News | बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, 13 जखमी