Sero Survey : कागदावर ज्या जिल्ह्यात नव्हते ‘कोरोना’चे रूग्ण, तिथं मे महिन्यात निघाल्या 8.5 लाख केस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात करण्यात आलेल्या सीरो सर्वेच्या निष्कर्षांनी प्रत्येकाला हैराण केले आहे. या सर्वेनुसार, मे महिन्यापर्यंत देशभरात सुमारे 64 लाख लोक कोरोना संक्रमित झाले होते. या सर्वेतून समजले की, ज्या भागात कागदावर एकही रूग्ण नव्हता, तेथे सुद्धा मोठ्या संख्येने लोक या व्हायरसने ग्रस्त झालेले होते.

सर्वेच्या आकड्यांनुसार मे महिन्यात सांगण्यात आले होते की, देशाच्या 233 जिल्ह्यात कोरोनाची कोणतीही केस नाही, परंतु आता समजले आहे की, येथे 8.56 लाख रूग्ण होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने गुरुवारी देशभरात केलेल्या सीरो सर्वेच्या अहवालाची घोषणा केली होती.

233 जिल्ह्यात 13% रूग्ण
सीरो सर्वेच्या डेटाद्वारे हे सुद्धा समजले आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये झीरो केस असल्याचे सांगण्यात आले होते, तेथे प्रत्यक्षात देशातील 13 टक्के कोरोना रूग्ण होते. रिसर्चरचे म्हणणे आहे की, यातून समजते की, देशात कोरोना येण्याच्या सुरूवातीच्या काळात रूग्णांचा योग्य पद्धतीने शोध घेतला गेला नव्हता.

याशिवाय देशाच्या प्रत्येक भागात टेस्ट सुद्धा होत नव्हत्या. यामुळे देशाच्या प्रत्येक भागात संसर्ग वेगाने वाढू लागला. सीरो सर्वेचे निष्कर्ष सांगतात की, भारतातील गावांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 69.4% लोग बाधित झाले, तर शहरी झोपड्यांमध्ये हे 15.9 टक्के आणि शहराच्या उर्वरित भागातील वस्त्यांमध्ये 14.6 टक्के नोंद झाली आहे.

सर्वेत आणखी काय समजले
आयसीएमआरनुसार, हा सर्वे 11 मेपासून 4 जूनदरम्यान करण्यात आला. यादरम्यान, 4,28,000 प्रौढांची सॅम्पल घेण्यात आले. हे सर्वे 21 राज्यांच्या 70 जिल्ह्यांत करण्यात आले. बहुतांश सर्वे ग्रामीण भागात झाले. वयाच्या हिशेबाने पॉझिटिव्हिटी रेट अशाप्रकारे होते – 18ते 45 वर्ष – 43.3% , 46-60 वर्ष – 39.5% , 60 वर्षांच्यावर – 17.2%.हा सर्वे त्यावेळची स्थिती दर्शवते, जेव्हा देशात लॉकडाऊन होते आणि मोठ्या संख्येने शहराकडून गावांकडे लोकांचे पलायन झाले.

काय आहे सीरो सर्वे
या सर्वेअंतर्गत सामान्यपणे या गोष्टीचा शोध घेतला जातो की, अखेर कोणत्या जिल्ह्यात किंवा शहरात किती लोक कोरोना संक्रमित होऊन बरे झाले आहेत. शरीरातील अँटीबॉडीद्वारे याचा शोध घेतला जातो. याशिवाय कोरोनाचे संकट कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहचले आहे का, हे सुद्धा यातून समजते. सीरो सर्वेचा पहिला टप्पा या वर्षी वेगवेगळ्या शहरांत आणि राज्यात लॉकडाऊनच्या दरम्यान मेमध्ये करण्यात आला होता.