लोक घेताहेत E-संजीवनीचा लाभ, 10 दिवसात आले विक्रमी 2 लाख कॉल

नवी दिल्ली : कोरोना काळात आपल्या घरात जास्तवेळ राहण्यास लोक प्राधान्य देत आहेत, असे लोक घरबसल्या मेडिकल कन्सल्टन्सीच्या सुविधेचा मोठा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ई-संजीवनीद्वारे दोन लाख लोकांनी टेली-कंसल्टेशन घेतले आहे. हा लाभ अवघ्या 10 दिवसात मिळवला आहे.

पीटीआयनुसार आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विक्रमी दोन लाख लोकांनी ई-संजीवनीद्वारे टेली-कंसल्टेशनची सेवा घेतली आहे. हा लाभ 9 ऑगस्टपासून आतापर्यंत अवघ्या 10 दिवसात मिळवला आहे. तर नोव्हेंबरपासून आजपर्यंत 23 राज्य, ज्यामध्ये 75 टक्के लोकसंख्येचा सहभाग आहे, त्यांनी टेली-कंसल्टेशन ई-संजीवनी लागू केली आहे. याशिवाय दुसरी राज्यसुद्धा ही लागू सुविधा लागू करण्याच्या प्रक्रिया करत आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल भारतच्या दृष्टीने ई-संजीवनी हे एक मोठे पाऊल आहे. ई-संजीवनीचा वापर लोकांमध्ये वाढत आहे. याद्वारे रूग्णाची काळजी घेणारे, मेडिकल क्षेत्राशी संबंधीत लोक आणि कोरोना व्हायरसच्या या काळात आरोग्य सेवा हवी असणार्‍या लोकांना ती सहज उपलब्ध होत आहे.

ई-संजीवनी दोन पद्धतीने टेली-मेडिसिन कंसल्टन्सी उपलब्ध करून देते. यामध्ये एक कंसल्टन्सी डॉक्टरची दुसर्‍या डॉक्टरसोबत उपलब्ध आहे. डॉक्टरसोबत डॉक्टरची कंसल्टन्सी आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांतर्गत लागू केली जात आहे. याशिवाय दुसरी रूग्णासोबत डॉक्टरांची कंसल्टन्सी उपलब्ध आहे.

तर आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा विचार करता, यावर्षी एप्रिल महिन्यात ई-संजीवनी ओपीडीची सुरूवात केली होती. यामध्ये टेली-कसल्टन्सीद्वारे रूग्ण डॉक्टरांशी जोडला जातो.