काय सांगता ! होय, प्रेयसीला भेटण्यास गेला होता 11 वी चा विद्यार्थी, कुटुंबियांनी पाहिल्यावर सुटला पळत अन् थेट पोहचला PAK मध्ये

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात असे एक प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच चकित केले आहे. वास्तविक, येथे राहणारा 11 वीचा विद्यार्थी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थी तेथून पळून गेला, परंतु गडबडीत तो सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये पोहोचला. तेथे पाकिस्तानी सैन्याने त्याला ताब्यात घेतले. आता भारतीय अधिकारी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर विद्यार्थ्याला परत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरण बाडमेर जिल्ह्यातील कुंभारांच्या टिबा गावचे आहे. जमाराम मेघवाल हे आपली पत्नी अंबू देवी आणि 18 वर्षाचा मुलगा गेमराराम यांच्यासह येथे राहतात. जामाराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी मुलाला पाकिस्तानमधून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी गेमरारामने चुकून भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली आणि त्याला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.

अशाप्रकारे उडाला गोंधळ

4-5 नोव्हेंबर 2020 रोजी दीड वाजता, गेमराराम आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी विद्यार्थ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने तेथून पळ काढला आणि रात्रीच्या अंधारात त्याने सीमा ओलांडली. वास्तविक, मुलीचे घर भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना त्यावेळी समजली, जेव्हा 16 नोव्हेंबर रोजी त्याच्या बेपत्ता होण्याबाबत कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बीएसएफशी संपर्क साधला. 5 जानेवारी रोजी सैन्य दलाच्या जवानांनी पाकिस्तानी रेंजर्सबरोबर ध्वज बैठक घेतली, ज्यात त्यांनी विद्यार्थी ताब्यात असल्याची माहिती दिली.

विद्यार्थ्याच्या भावाने दिली माहिती

विद्यार्थ्यांचा मोठा भाऊ जुगतारामने सांगितले की, त्याचा भाऊ एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करतो. कोविड लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यावर त्यांने जोधपूरमधील फर्निचरच्या दुकानात काम करण्यास सुरवात केली आणि 4 नोव्हेंबरला तो घरी परतला. त्याच रात्री तो आपल्या प्रेयसीला भेटायला गेला आणि 5 नोव्हेंबरला त्याचा फोन बंद लागला.

या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनी तिची मुलगी आणि गेमराराम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे नाकारले. जुगताराम म्हणााला की, त्या मुलीच्या कुटुंबियांनी त्या रात्री आम्हाला बोलावून या प्रकरणाची माहिती दिली होती, परंतु आता ते आमचा छळ करीत आहेत. तसेच माझा भाऊ शोधू नये यासाठी दबाव आणला जात आहे. जुगतारामचा असा दावा आहे की त्याच रात्री त्याच्या भावाने सीमा ओलांडल्याची माहिती मुलीच्या कुटूंबियांना झाली होती, तर बीएसएफच्या अधिकाऱ्याांनी दहा दिवसांनंतर ही माहिती दिली.

1971 साली पाकिस्तानातून आले होते पीडित कुटुंब

जमारामला एकूण 12 मुले आहेत, त्यापैकी गेमराराम आठवा मुलगा आहे. 1971 मध्ये त्यांचे कुटुंब पाकिस्तानहून भारतात आले होते. त्याचवेळी, मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, गेरामाराम चुकीच्या हेतूने त्याच्या घरात घुसला. तो आणि माझी मुलगी शाळेत शिकतात, पण ते मित्र नाहीत. माझ्या मुलीने गेमरमचा विनयभंग केल्याबद्दल अनेकदा आपल्या भावांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे, बीएसएफ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्याला लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.