‘हेरा फेरी 3’ बद्दल ईशा गुप्ताचा चकित करणारा ‘खुलासा’ !

बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा हेरा फेरीची फ्रेंचायजी हेरा फेरी 3 बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अॅक्ट्रेस ईशा गुप्तानं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत चकित करणारा खुलासा केला आहे. ईशानं सांगितलं आहे की, ती आता या सिनेमाचा हिस्सा नाही. ती असंही म्हणाली की, जोपर्यंत नीरज वोहरा या सिनेमा डायरेक्टर करत होता तोपर्यंत ती या सिनेमाचा हिस्सा होती.

एका मुलाखतीत बोलताना ईशा म्हणाली, “मी हेरा फेरी 3 चा हिस्सा नाही. परंतु सिनेमावर काम सुरू आहे. जोपर्यंत या सिनेमाचे रायटर आणि दुसऱ्या भागाचे डायरेक्टर नीरज वोहरा सर जिवंत होते तोवर मी या सिनेमाचा भाग होते. ते खूपच कमी वयात जग सोडून गेले. ते गेल्यानंतरच मी या सिनेमाचा हिस्सा नव्हते. सध्या सिनेमाची काय कंडिशन आहे हेही मला सांगता येणार नाही.”

पुढे बोलताना ईशा म्हणाली, “सिनेमाबद्दल काही सांगण्यासाठी मी योग्य पर्सन नाही. हेरा फेरी 3 दीपिक तिजोरी डायरेक्ट करत आहेत.”

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.