Homeआरोग्यमोठा दिलासा ! आता ESI कार्डधारक देखील घेऊ शकतात खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार

मोठा दिलासा ! आता ESI कार्डधारक देखील घेऊ शकतात खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार

नवी दिल्ली : आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांच्या घराच्या 10 किमी अंतरावर जर ESIC रुग्णालय नसेल तर आता त्यांना होणाऱ्या अडचणींपासून थोडा दिलासा मिळणार आहे. संबंधित कर्मचाऱ्याला राज्य विमा निगमच्या पॅनेलमध्ये समावेश असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाता येणार आहे. याबाबतची माहिती देण्यात आली.

कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीमध्ये सांगितले, की नव्या क्षेत्रांमध्ये ESI योजनेचा विस्तार करताना ESI लाभार्थींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये ESI सदस्यांना त्यांच्या घराजवळ उपचाराची सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने बेसिक इंफ्रास्ट्रक्चरचा विस्तार आणि सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कोणत्याही मंजूरची नाही गरज

काही क्षेत्रांमध्ये ESI रुग्णालय, डिस्पेन्सरी या इन्श्युर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या (IMP) 10 किमी परिसरात नसल्याने लाभार्थ्यांना वैद्यकीय उपचार घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता ESI लाभार्थ्यांना देशात ESI च्या पॅनलमध्ये समावेश रुग्णालयात उपचाराची सुविधा मिळावी, यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थींना कोणत्याही ESIC रुग्णालयात मंजूरीची आवश्यकता नसेल.

कोणत्या कागदपत्रांची गरज?

ESI ओळखपत्र किंवा आरोग्य पासबुक दाखवणे गरजेचे आहे. याशिवाय आधारकार्डही घेऊन जायला हवे. अशा लाभार्थींना OPD मध्ये डॉक्टरांकडून लिहिलेल्या औषधांसाठीचे पैसेही परत मिळू शकतील.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News