ESIC Covid Benefits | लाखो कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! कोरोनाने मृत्यू झाला तर आई, पत्नी, मुलगा, मुलगी सर्वांना मिळेल पेन्शन; जाणून घ्या

नवी दिल्ली : सरकारने कोरोना महामारी दरम्यान अनेक मदतींची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी सरकारने ESIC पेन्शनबाबत नियमांमध्ये (ESIC Covid Benefits) बदल केला होता. लेबर मिनिस्ट्रीकडून सांगण्यात आले की जर एखाद्या वर्करचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि तो ESIC Covid Benefits च्या अंतर्गत कव्हर आहे तर त्यास ईएसआयसी पेन्शनचा लाभ मिळेल. मात्र, यासोबतच काही अटींचा सुद्धा यात समावेश करण्यात आला आहे. या नियमांबाबत जाणून घेवूयात…

ESIC scheme च्या अंतर्गत जे लोक येतात, त्यांच्या कुटुंबाला कोरोना संकटात मदत देण्याच्या हेतूने नियमात हा तात्कालिक बदल केला गेला आहे. नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू केला आहे आणि पुढील दोन वर्ष म्हणजे 24 मार्च 2022 पर्यंत लागू राहील. ESIC Pension चा कशाप्रकारे फायदा मिळेल, त्यापूर्वी आवश्यक अटींबाबत जाणून घेवूयात.

पात्रतेची पहिली अट

पात्रतेची पहिली अट ही आहे की इंश्युअर्ड पर्सनचे ईएसआयसी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कोविड डिटेक्ट झाल्याच्या किमान तीन महिने अगोदर असायला हवे.

(second condition of eligibility) पात्रतेची दुसरी अट

दुसरी अट ही आहे की, इंश्युअर्ड व्यक्तीच्या मृत्यूच्या एक वर्ष अगोदर त्याचे योगदान किमान 78 दिवसांचे असावे. जर दोन्ही कंडिशन पूर्ण होत असतील तर पीडित कुटुंबांना पेन्शनचा लाभ मिळेल.

किती मिळेल पेन्शन?

ESIC Pension Scheme च्या अंतर्गत अ‍ॅव्हरेज डेली वेजच्या 90 टक्के पेन्शनच्या रूपात मिळेल. जर एखाद्या वर्करचा अ‍ॅव्हरेज वेज 20 हजार रुपये आहे तर त्याच्या कुटुंबाला पेन्शन आणि सहायता म्हणून एकुण 18000 रुपये दर महिना मिळतील. अ‍ॅव्हरेज वेज काढण्याबाबत सुद्धा नियम दिला आहे.

ESIC Covid Benefits | esic covid benefits pension for all family members if worker dies of coronavirus esic pension scheme details

या आधारावर ठरेल पेन्शन

प्रत्येक आर्थिक वर्षात दोन काँंट्रीब्यूशन पीरियड येतात. पहिला पीरियड एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत असतो. दुसरा पीरियड ऑक्टोबरपासून मार्चच्या दरम्यान असतो. एप्रिल-सप्टेंबर काँट्रीब्यूशन पीरियडसाठी येणार्‍या वर्षाच्या जानेवारी-जूनपर्यंच्या पीरियडला बेनिफिट पीरियड म्हणतात. तसेच ऑक्टोबर-मार्च काँट्रीब्यूशन पीरियडसाठी त्यावर्षीच्या जुलैपासून डिसेंबर बनिफिट पीरियड म्हणतात. इंश्युअर्ड पर्सनसाठी मागील काँट्रीब्यूशन पीरियडची अ‍ॅव्हरेज सॅलरी पेन्शनचा आधार असेल.

कुणा-कुणाला मिळतो पेन्शनचा लाभ?

– जर इंश्युअर्ड पर्सन विवाहित होता तर त्याची पत्नी, आई, मुलगा, आणि मुलगी यांच्यात विभागली जाईल.

– पत्नीला पेन्शन रेटच्या 60 टक्के लाईफ टाइम मिळेल.

– आईला पेन्शन रेटच्या 40 टक्के पूर्ण जीवनभर मिळतील.

– मुलाला पेन्शन रेटच्या 40 टक्के त्याची वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळतील.

– तर मुलीचे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तिला पेन्शन मिळेल.

– पेन्शन रेट अ‍ॅव्हरेज वेजच्या 90 टक्के असतो.

– आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, यामध्ये टोटल पेन्शन अमाऊंट पेन्शन रेटपेक्षा जास्त
होऊ शकत नाही. जर हा जास्त झाला तर त्यामध्ये कपात केली जाईल.

हे देखील वाचा

Mumbai Rains | गोंवडीत घर कोसळून 3 ठार तर 8 जण जखमी; शहरातील तिसरी घटना

Mulshi Dam | ‘ताम्हिणी’त सलग दुसर्‍या दिवशी अतिवृष्टी ! 24 तासात 514 मिमी पावसाची नोंद,  मुळशी धरणात ऐतिहासिक 80 दलघमी (2.83 TMC) पाण्याची आवक,  उजनी धरण प्लसमध्ये

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ESIC Covid Benefits | esic covid benefits pension for all family members if worker dies of coronavirus esic pension scheme details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update