खुशखबर ! ESIC मध्ये आता येतील 30 हजार रुपये पगार घेणारे कर्मचारी, जाणून घ्या काय आहे योजना?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळच्या मेडिकल स्कीमची (Medical benefit) कक्षा वाढू शकते. या स्कीम अंतर्गत 30 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळवणार्‍या कर्मचार्‍यांना सहभागी केले जाऊ शकते. सध्या ESIC चा लाभ 21 हजार रुपयांपर्यंत पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांना होऊ शकतो. हा नवीन प्रस्ताव ESIC बोर्डाच्या बैठकीत ठेवला जाईल तिथे मंजूरीनंतर सरकारकडे पाठवला जाईल.

मीडिया रिपोर्टनुसार, जर हा प्रस्ताव पास झाला तर 20-25 टक्के कर्मचारी या कक्षेत येतील.
ईएसआयसी बोर्डची बैठक सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहे.
ESIC स्कीमच्या अंतर्गत येणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगला उपचार मिळू शकतो.

ईएसआयसी योजनेंतर्गत मिळणारे लाभ

ईएसआयसी स्कीमच्या सदस्याच्या सॅलरीच्या 0.75 टक्के अंश घेतला जातो तर कंपनीकडून 3.25 टक्के अंश घेतला जातो.

ESIC स्कीम अंतर्गत देशात 6 कोटी कर्मचारी येतात.

सध्या योजनते कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे लाभ वाढवले आहेत.

आता ग्रॅच्युटीच्या पेमेंटसाठी किमान सेवेची आवश्यकता नाही.

EPF आणि MP कायद्याच्या तरतुदीनुसार, कौटुंबिक पेन्शनचे पेमेंट केले जात आहे.

कर्मचारी आजारी झाल्यास आणि कार्यालयात न येण्याच्या स्थितीत वर्षात 91 दिवसांसाठी आजारपणाचा लाभ म्हणून एकुण मजूरीच्या 70 टक्के पैसे दिले जातात.

 

ESIC ची नवीन योजना

ईएसआयसीची नवीन योजना कोविड पेन्शन रिलीफ स्कीम (CPRS) अशा कर्मचार्‍याच्या कुटुंबाला आयुष्यभर पेन्शन प्रदान करते, ज्याचा मृत्यू कोविडने झाला आहे. याची रक्कम किमान 1800 रुपये प्रति महिन्यापासून मृत कामगाराच्या सरासरी दैनिक वेतनाच्या 90% पर्यंत असू शकते. ही योजना 24 मार्च 2020 पासून दोन वर्षांसाठी लागू केली आहे.

 

Web Title : ESIC | employees getting salary of 30 thousand rupees will also come to esic know what is the plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याचा भाव वाढला, चांदी सुद्धा महागली; जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | 10 % दराने व्याज वसूल करुन 2.5 लाखाची खंडणी उकळणार्‍या सावकारास आणि त्याच्या साथीदारांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Pune News | मंगळवार पेठेतील कै. भागुजीराव बारणे शाळा स्थलांतरीत करू नये; शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी